शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मतमोजणी अधिकाऱ्यांवर गुन्हा

By admin | Updated: June 26, 2015 02:25 IST

शहरालगतच्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.२ मधील निवडणुकीत मतमोजणीत ईव्हीएमचे सील तोडून अफरातफर केल्याच्या ...

पुसद : शहरालगतच्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.२ मधील निवडणुकीत मतमोजणीत ईव्हीएमचे सील तोडून अफरातफर केल्याच्या आरोपावरून दोन मतमोजणी अधिकाऱ्यांवर पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी तहसीलदारांना तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. एका उपअभियंत्यासह तलाठ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.मतमोजणी पर्यवेक्षक तथा जिल्हा परिषद बांधकाम अभियंता सुनील नाईक आणि तलाठी श्रीराम बोडखे असे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार, शहरालगतच्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २२ एप्रिल २०१५ रोजी पार पडली, तर २३ एप्रिल २०१५ रोजी सकाळी ११ वाजता येथील बचत भवनामध्ये मतमोजणी पार पडली. मात्र वॉर्ड क्र.२ मधील मतमोजणीच्या वेळी ईव्हीएमला सील नसून त्यातील मेमरी कार्ड काढण्यात आल्याची बाब मतदान प्रतिनिधींच्या लक्षात आली. त्यावेळी येथे उपस्थित असलेले मतदान प्रतिनिधी तथा उमेदवार संजय ढगे व मधुकर कलिंदर यांनी आक्षेप नोंदविला असता मतमोजणी पर्यवेक्षक तथा अभियंता सुनील नाईक व तलाठी श्रीराम बोडखे आदींनी आक्षेप फेटाळून लावत दुसरे मेमरी कार्ड ईव्हीएममध्ये टाकल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणाची तब्बल २२ मिनिटांची सीडी तयार करण्यात आली. यावर निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांनी वॉर्ड क्र.२ ची मतमोजणी स्थगीत केली. मात्र मतदान प्रतिनिधी कक्षाच्या बाहेर पडताच मतमोजणी सुरू करून निकालही जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे वॉर्ड क्र. २ मधून अनुसूचित जमातीचा सरपंच पदाचा उमेदवार होता, हे विशेष.यावर पराभूत उमेदवार संजय ढगे यांनी आक्षेप नोंदवून वॉर्ड क्र.२ मधील मतमोजणीत अफरातफर झाल्याची लेखी तक्रार तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे दाखल केली व त्याची एक प्रत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांना पाठविली. या संपूर्ण प्रकरणाची तब्बल २२ ते २४ मिनिटांची सिडीसुद्धा जिल्हाधिकारी व निवडणूक आयोबाकडे पाठविण्यात आली. या सिडीमध्ये ईव्हीएमला सिल नसून पहिली मेमरी काढून दुसरी मेमरी टाकण्यात आल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे.निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी आदींनी या सर्व बाबींचा अभ्यास करून मतमोजणी पर्यवेक्षक सुनील राऊत व सहाय्यक श्रीराम बोडखे हे दोषी आढळल्याने अखेर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतासिंह यांनी तहसीलदार भगवान कांबळे यांना दिले. त्यावरून तहसीलदारांचे प्रतिनिधी कनिष्ठ लिपिक वसिम अहमद अब्दुल समद यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून या दोघांविरुद्ध भादंवि १२८, १३४, १३६ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश हुरकुडे करीत आहे. या प्रकरणी प्रस्तूत प्रतिनिधीने तहसीलदार भगवान कांबळे यांची भेट घेतली असता ग्रामपंचायत निवडणुकीतील वॉर्ड क्र.२ चे मतमोजणी पर्यवेक्षक सुनील नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचा ई-मेल आला असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)