शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंडळाच्या शाळांमध्येही लागू होणार ‘क्रेडिट सिस्टिम’, विद्यार्थ्यांच्या अन्य कौशल्यांनाही मिळणार वाव 

By अविनाश साबापुरे | Updated: April 19, 2024 06:03 IST

शिक्षण आयुक्तांचे सूतोवाच : विद्यार्थ्यांच्या अन्य कौशल्यांनाही मिळणार वाव

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यार्थी केवळ पुस्तकी हुशार न बनता त्यांना प्रत्यक्ष जीवनकौशल्ये आत्मसात करता यावी, यासाठी नव्या शिक्षण धोरणात खास तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण ‘परफाॅर्मन्स’ पाहून त्यांना ‘क्रेडिट’ दिले जाणार आहे. ही क्रेडिट पद्धती सीबीएसई शाळांपाठोपाठ आता राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्येही लागू केली जाणार आहे. 

२०२४-२५ या सत्रापासून इयत्ता नववी आणि अकरावीसाठी ही पद्धती लागू केली जाणार आहे. तर २०२५-२६ या सत्रात इयत्ता दहावी आणि बारावीसाठी लागू केली जाणार आहे. सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीसाठी ही पद्धती लागू करणार असल्याचे सीबीएसई बोर्डाने नुकतेच जाहीर केले आहे. 

पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना वापरता येणार क्रेडिट - राज्य मंडळाच्या शाळांमध्ये क्रेडिट पद्धती लागू करण्याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सूतोवाच केले आहे.    - विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे क्रेडिट ‘ॲकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’मध्ये जमा करून ठेवले जाणार आहे. - बँकेतील या क्रेडिटचा विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतेवेळी उपयोग होण्याची शक्यता आहे. 

असे दिले जाईल क्रेडिट

  • प्रत्येक वर्षात १२०० शैक्षणिक तासिका विद्यार्थ्यांना पूर्ण कराव्या लागतील.
  • त्या बदल्यात त्यांना ४० श्रेयांक किंवा क्रेडिट दिले जातील.
  • श्रेयांकाच्या मोजणीसाठी दर ३० तासिकांसाठी एक श्रेयांक असे सूत्र असेल.
  • एखाद्या विद्यार्थ्याला या ४० श्रेयांकापेक्षाही अधिक श्रेयांक मिळविता येतील.
  • त्यासाठी विद्यार्थ्याला आवडीप्रमाणे अतिरिक्त अभ्यासक्रम, कार्यक्रम, विषय, प्रकल्प घेता येतील.

या गोष्टींसाठी मिळेल क्रेडिट वर्गातील शिक्षण, प्रात्यक्षिक, नवोपक्रम प्रयोगशाळेतील कामगिरी, वर्गातील प्रकल्प, क्रीडा, योग, शारीरिक उपक्रम, विविध कलाप्रकार, संगीत, हस्तकला, सामाजिक कार्य, राष्ट्रीय छात्र सेना, परीक्षा, चाचण्या, व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य शिक्षण, क्षेत्रभेटी, प्रत्यक्ष कार्यानुभव, इंटर्नशिप, ॲप्रेंटिसशिप आदींमधील विद्यार्थ्यांचा सहभाग व कामगिरी लक्षात घेऊन क्रेडिट दिले जाणार आहेत.  

कला, क्रीडा, व्यवसाय शिक्षण या बाबींचा आजच्या शिक्षण पद्धतीत ‘एक्स्ट्रा करिक्युलर’ म्हणून समावेश आहे. परंतु, आता क्रेडिट सिस्टिममुळे तो सिलॅबसचाच भाग बनेल. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये क्रेडिट सिस्टिम याच सत्रात लागू होईल का, हे आताच नाही सांगता येणार, मात्र लवकरात लवकर लागू करण्याचा प्रयत्न आहे. - सूरज मांढरे, शालेय शिक्षण आयुक्त

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळा