शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘मार्जीन मनी’च्या कामांची खिरापत

By admin | Updated: August 30, 2014 02:10 IST

मार्जीन मनीची कामे सोसायट्यांना व सुशिक्षित बेकारांना देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसात तीन कोटी रुपयांच्या कामाचे वाटप केले आहे.

महागाव : मार्जीन मनीची कामे सोसायट्यांना व सुशिक्षित बेकारांना देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसात तीन कोटी रुपयांच्या कामाचे वाटप केले आहे. अधिकाऱ्यांच्या कमिशन पॅर्टनमुळे ठेकेदारांमध्ये नाराजी असून, खऱ्या अर्थाने विकासकामांना खीळ बसल्याचे दिसून येत आहे. दलित वस्तीमधील सभागृहाच्या बांधकामासाठी दोन वेळा टेंडर बोलावूनसुद्धा एकाही कंत्राटदाराने ते भरले नाही. ओपन टेंडरला लावलेल्या कामांमध्ये कंत्राटदारांना काहीच वाचत नसल्यामुळे ते अशी कामे करण्यास उत्सुक नाही. शासनाचा मात्र दलितवस्ती सुधार योजनेविषयीचा हेतू किती प्रामाणिक आहे हे यावरून दिसून येते. ओपन टेंडर बोलावूनसुद्धा टेंडर आले नसल्यामुळे एकट्या उमरखेड विधानसभा मतदारसंघातील महागाव, उमरखेड तालुक्यात एक कोटी रुपयांचे दलितवस्तीमधील समाज मंदिराचे बांधकाम लोंबळत पडले आहे. पुसद कार्यकारी अभियंता कार्यालयात छोट्या कंत्राटदाराची चांगलीच गळचेपी होत असून, प्रत्येक कामात कमिशनच्या टक्केवारीत वाढ झाल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बहुतांश सोसायट्यांना सिमेंट रस्ता कामाचे पत्र देण्यात आले आहे. १० लाखांचे काम असेल तर काम होण्यापूर्वीच १० टक्के कमिशन मोजावे लागत असल्याने कामाचा दर्जा कसा असेल याची कल्पना न केलेली बरी. सर्वांचे मिळून कमिशन एकत्रित केल्यास संबंधीत कंत्राटदाराला सिमेंट रस्ता कसातरी अ‍ॅडजेस्ट करावा लागत आहे. काही ठिकाणी पूर्णत्वास आलेल्या सिमेंट रस्त्याची लांबी-रूंदी कमी झाल्याचे दिसून येते. भ्रष्टाचारामुळे सिमेंट रस्ते आटरल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. महागाव तालुक्यातील मुडाना, कोठारी, डोंगरगाव, वरोडी, धारमोहा, लोहरा आणि ब्रह्मी येथील दलित वस्तीमधील मंजूर असलेल्या सभागृहाच्या बांधकामाचे टेंडर अद्याप कुणीही भरलेले नाही. त्यामुळे या कामाचे दोन वेळा टेंडर बोलाविण्यात आले आहे. उमरखेड तालुक्यातील सिंदगी, भांब, खरूस, साईबाबा ट्रस्ट इंदिरा गांधी वार्ड उमरखेड, दराटी, विठ्ठल मंदिरासमोर उमरखेड, वरूड बीबी, चातारी, बोरी, डोंगरगाव आदी ठिकाणची दलित वस्तीमध्ये बांधावयाचे सभागृहाचे टेंडर दुसऱ्यांदा काढण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कार्यकारी अभियंता कार्यालयात मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले आहे. पुसद येथील मार्जीन मनीची कामे पुसद येथील एकाच मोठ्या कंत्राटदाराला देण्यात आली आहे. इतरांना मात्र काहीच नाही. त्यामुळे अनेक लहान कंत्राटदारांमध्ये नाराजी पसरली आहे. (शहर प्रतिनिधी)