शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

भूसंपादन अध्यादेश रद्दसाठी भाकपचा मोर्चा

By admin | Updated: May 16, 2015 00:18 IST

केंद्र शासनाने भूमी अधिग्रहण अध्यादेश काढला. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गुरूवारी मोर्चा ...

वणी : केंद्र शासनाने भूमी अधिग्रहण अध्यादेश काढला. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गुरूवारी मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. केंद्र शासनाने ३१ मार्चला भूमी अधिग्रहण अध्यादेश काढला आहे. त्यापूर्वी १८९४ मध्ये ब्रिटिशांनी भूसंपादनाचा कायदा करून देशातील शेतकऱ्यांवर अन्याय केला होता. त्यामुळे सन २०१३ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने भूसंपादन पुनर्वसनाचा कायदा बदलविला होता. त्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. मात्र नरेंद्र मोदी सत्तेवर येताच त्यांनी प्रथम कॉपोर्रेट लॉबी व बिल्डर्सना जमिनी सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सन २०१३ चा कायदा बदलून अध्यादेश काढला, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.लोकसभेत बहुमतामुळे हा अध्यादेश मंजूर झाला. तथापि राज्यसभेत केंद्र सरकारचे बहुमत नसल्याने डिसेंबर २०१४ चा अध्यादेश संपुष्टात येणार होता. त्यामुळे ३१ मार्च २०१५ रोजी केंद्र सरकारने नव्याने अध्यादेश काढला. या अध्यादेशामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. परदेशी आणि देशी कॉपोर्रेट कंपन्या, भूमाफिया, बिल्डर, दलाल हे बागायती, दुबार पिकांच्या पाण्याखालील जमिनी बळकावरणार आहेत. हा अन्न सुरक्षेला धोका असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे. २०१३ मधील भूसंपादन कायद्याने शेतकऱ्याच्या हिताच्या केलेल्या सर्व तरतुदी यानवीन अध्यादेशात काढून टाकण्यात आल्या आहेत. नवीन अध्यादेशात ८० टक्के शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भूसंपादन करता येणार नाही, ही अट काढून टाकण्यात आली आहे. मोदी सरकार २८ इंडस्ट्रियल कॉरिडॉर निर्माण करणार आहे. त्यामध्ये देशातील एकूण पिकाऊ जमिनीपैकी ३५ टक्के जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यात हजारो गावे गायब होण्याची भिती आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप शासन व महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना शासनाने हा अध्यादेश ताबडतोब परत घेऊन लॅड अ‍ॅक्विझिशन अ‍ॅन्ड रिसेटलमेंट अ‍ॅक्ट २०१३ चा कायदा अंमलबजावणीत आणावा, अशी मागणी अनिल घाटे, दिलीप परचाके, बंडू गोलर, धनंजय आंबटकर, दशरथ येनगंटीवार, ऋषी उलमाले, नमिता पाटील व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)