शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

कापूस, सोयाबीनने माना टाकल्या

By admin | Updated: July 13, 2015 00:16 IST

जुलै महिना अर्धा संपत आला तरी उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत असल्याने शेतात उगवलेले कापूस आणि सोयाबीनचे रोपटे माना टाकत आहे.

दुबार पेरणीचे संकट : महागावात आतापर्यंत केवळ १५४ मिमी पाऊस महागाव : जुलै महिना अर्धा संपत आला तरी उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत असल्याने शेतात उगवलेले कापूस आणि सोयाबीनचे रोपटे माना टाकत आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट अटळ आहे. आतापर्यंत तालुक्यात केवळ १५४ मिमी पावसाची नोंद झाली असून पाण्याची पातळी खोल गेल्याने दुष्काळाचे सावट आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसात महागाव तालुक्यात जवळपास ८० टक्के पेरणी झाली. २४ हजार २१० हेक्टरवर कपाशी तर १३ हजार ७५० हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आले. पोषक वातावरण असल्याने पीक बहरले. मात्र त्यानंतर आता जुलै महिना अर्धा संपला तरी तालुक्यात कुठेही पावसाची नोंद नाही. दररोज उन्हाळ्यासारखे कडक उन्ह तापत आहे. गतवर्षीही पाण्याचे प्रमाण अल्प होते. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली होती. यावर्षीही पाण्याचे अल्पप्रमाण असल्याने भूगर्भातील जल पातळी खालावली आहे. त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. गावागावातील शेतात भयानक वातावरण दिसत आहे. शेतकरी शेतात जाऊन माना टाकलेल्या पिकाकडे हताश होऊन पाहत आहे. अशा स्थितीत आता दुबार पेरणीचे संकट अटळ दिसत आहे. अत्यल्प पावसाने गावागावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिरपूर येथे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सभापती गोदावरीबाई जाधव, गटविकास अधिकारी शेळके यांनी या गावांना भेट देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील ११० गावांचे प्रतीक शिरपूर मानले जात आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर मुडाणा, घानमुख, शिरमाळ, बिजोरा, वडद, नांदगव्हाण, वरोडी, कासारबेहळ, टेंभी, उटी, सवना, अंबोडा येथे महिलांची पायपीट सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)