शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

जिल्हा मुुख्यालयात कापसाचे दर पाडले

By admin | Updated: December 18, 2015 02:51 IST

खासगी बाजारात कापसाचे दर ४४०० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. मात्र यवतमाळच्या बाजारात कापसाचे दर ४२०० रूपये क्विंटलपर्यंत मर्यादित राहिले आहे.

नियंत्रण सुटले : यवतमाळात ४२०० तर, इतरत्र ४४०० रूपये रूपेश उत्तरवार यवतमाळखासगी बाजारात कापसाचे दर ४४०० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. मात्र यवतमाळच्या बाजारात कापसाचे दर ४२०० रूपये क्विंटलपर्यंत मर्यादित राहिले आहे. यामध्ये क्विंटलमागे २०० रूपयांची तफावत आहे. शेतकऱ्यांची यातून अक्षरश: लूट होत आहे. मात्र त्यावर चाप लावण्यात सहकार विभागाला सपशेल अपयश आले आहे. कापूस विक्रीसाठी येणारे वाहन थेट व्यापाऱ्यांच्या दारात पोहोचत आहे. यामुळे बाजार समितीचा सेस बुडला आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १६ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यामध्ये १० लाख क्विंटल कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याची नोंद झाली आहे. खेडा खरेदीच्या माध्यमातून जिल्ह्यात हजारो क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे, याची नोंद नाही. जिल्हा मुख्यालयात परवाना नसताना अनेक व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केली आहे. या खरेदीला आता उधाण आले आहे. कापसाची विक्री करण्यासाठी बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी बोली बोलण्याचा सहकारचा नियम आहे. प्रत्यक्षात बाजार समितीच्या आवारात कापसाची बोली लावली जात नाही. खासगी व्यापारी परस्पर जिनात कापूस घेऊन जातात. याची नोंद बाजार समितीकडे होत नाही. विशेष म्हणजे, बोली न लागल्याने व्यापारी मनमानी दराने कापसाची खरेदी करतात. हा प्रकार राजरोसपणे सुरू झाला आहे. पणनची वाहने केवळ त्याला अपवाद ठरली आहेत. या गंभीर प्रकाराने बाजार समितीचा सेस दररोज बुडत आहे. याच संधीचा फायदा परवाना न घेतलेल्या व्यापाऱ्यांनी घेतला आहे. कुठलीही शासकीय प्रक्रिया न करता हे व्यापारी जिल्ह्याच्या ठिकाणी परस्पर कापसाची खरेदी करीत आहेत. यातून कापूस उत्पादकांची अक्षरश: लूट सुरू झाली आहे. खासगी बाजारात कापसाचे दर ४३०० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. यवतमाळमध्ये ३९०० ते ४२०० पर्यंत कापसाची खरेदी सुरू केली आहे. यवतमाळ वगळता लगतचे तालुके अमरावती, अचलपूर, धामणगाव या ठिकाणी कापसाचे दर ४३०० रूपये क्विंटलपर्यंत आहेत. यामध्ये क्विंटलमागे २०० ते ३०० रूपयांची तफावत आहे. लगतच्या तालुक्यांपेक्षा यवतमाळात अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. जिल्हा मुुख्यालयात शेतकऱ्यांची लूट होत असताना सहकार विभाग आणि बाजार समिती गप्प आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. जागतिक बाजारात कापसाची मागणी वाढल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे दर वाढले. मात्र यवतमाळात कापसाचे जुनेच दर शेतकऱ्यांवर लादले जात आहे.