शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी येथे नगरसेवकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:11 IST

येथील नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी पालिकेसमोर एक दिवसीय उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्यांनी पालिका पदाधिकारी व प्रशासनाला आपल्या कर्तृत्वाचा विसर पडल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देनियोजनशून्य कारभार : पालिका पदाधिकाऱ्यांना पडला कर्तृत्वाचा विसर

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी पालिकेसमोर एक दिवसीय उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्यांनी पालिका पदाधिकारी व प्रशासनाला आपल्या कर्तृत्वाचा विसर पडल्याचा आरोप केला.शहरात विकास कामे खोळंबली आहे. त्याला नगराध्यक्ष व प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे. विकास कामांचा खोळंबा, अनधिकृत आर्थिक व्यवहार, निकृष्ट दर्जाची कामे, कचऱ्याची समस्या आदी प्रश्नांवर काँग्रेस व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी लाक्षणिक उपोषण केले. विरोधी नगरसेवकांचे प्रशासनात कुणीही ऐकून घेत नाही. त्यामुळे जनतेला काय उत्तर देणार, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.नगरपरिषदेकडे उपलब्ध नऊ कोटींच्या निधीतून रस्ते, नाल्या, वास्तू व इतर विकास कामांच्या निविदा काढाव्या, घनकचरा, घंटागाड्या सुरू करून स्वच्छतेचे काम सुरू करावे, विद्युत साहित्य, स्टेशनरी, सिमेंट पाईप, मुरूम आदींच्या निविदा काढाव्या, आमणी विहिरीवरून पाण्याच्या टाकीपर्यंत झालेल्या दीड कोटीच्या कामाची गुणवत्ता तपासावी, प्रभाग क्र.१, ६, ७ मध्ये वाढीव पाणीपुरवठा सुरू करावा, करमूल्य निर्धारणाचे २५ लाख रुपये बेकायदेशीरपणे दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या. मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले.उपोषणात माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस गटनेते आरिज बेग, राष्ट्रवादीचे गटनेते चिराग शहा, नगरसेवक अन्वर पठाण, कादर इसाणी, निलंकुश चव्हाण, शंकर वाघमारे, यासिन नागाणी, अनिता भोयर, सुषमा सुरटकर, सुरेखा मेंडके, अंजली खंदार, उमा शिवरामवार, ज्योत्स्रा ठाकरे, स्वाती व्यवहारे, सुनीता पिल्लेवार सहभागी झाल्या होत्या. समस्या न सुटल्यास यापुढेही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला.

टॅग्स :Strikeसंप