शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालिका प्रशासनाविरोधात नगरसेवकांचा एल्गार

By admin | Updated: November 3, 2014 23:33 IST

उमरखेड नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरूद्ध माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांच्या नेतृत्वात विरोधी गटातील नगरसेवकांनी नगर पालिकेला कुलूप ठोकून कामकाज बंद पाडले.

उमरखेड (कुपटी) : उमरखेड नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरूद्ध माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांच्या नेतृत्वात विरोधी गटातील नगरसेवकांनी नगर पालिकेला कुलूप ठोकून कामकाज बंद पाडले. या आंदोलनात नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी १.३० वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. उमरखेड नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांच्या कोणत्याही तक्रारीची दखलच घेतल्या जात नाही. त्याचप्रमाणे शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घंटागाड्या नियमित कचरा गोळा करीत नाही, रस्त्याच्या कडेला खताचे उकिरडे दिसून येतात. शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद आहेत. डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित फवारणीसुद्धा होत नाही. यासोबतच सामान्य प्रशासन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, कर विभाग, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, आरोग्य व विद्युत विभागासंदर्भात नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. या तक्रारींची पालिका प्रशासनाकडून दखलच घेतल्या जात नाही. त्यामुळे माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. संतोष जैन, इनायतउल्ला, साजिद जागिरदार, रामराव भुरके, गजेंद्र ठाकरे, सागीरभाई आदींनी नागरिकांच्या मागण्यांसह नगर परिषदेवर धडक दिली. व सकाळी ९ वाजता पालिकेच्या मुख्य प्रवेश व्दाराला कुलूप ठोकले. व तेथेच धरणे आंदोलन सुरू केले. सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याने भाजपाचे शहराध्यक्ष नितीन भुतडा, शिवसेना शहर प्रमुख डॉ. अजय नरवाडे, डॉ. संजय तेला, प्रमोद रुडे, एजाज खान, दिनेश तेला, राजेश कवाने यांच्यासह शहरातील विविध भागातील शेकडो नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले. हे आंदोलन जवळपास सहा तास चालले. आंदोलकांची समजूत काढण्यासाठी मुख्याधिकारी प्रवीण मानकर, शिक्षण सभापती नंदकिशोर अग्रवाल, सुरेश माहेश्वरी यांनी तिथे येऊन आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. तसेच एक महिन्याच्या आत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)