शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडे कंत्राटदारांचे दोन कोटी रुपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:30 IST

नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नाचा ताळमेळ नसताना मोठ्या प्रमाणात रक्कम शासनाकडे दिली जात आहे. परिणामी आता नगपरिषदेकडे सामान्य निधी उपलब्ध नाही. २०१७-१८ मध्ये कंत्राटदारांनी केलेल्या कामांची देयके अद्याप निघाली नाही.

ठळक मुद्देनिधीची चणचण : यवतमाळ शहरातील विकास कामे रखडण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नाचा ताळमेळ नसताना मोठ्या प्रमाणात रक्कम शासनाकडे दिली जात आहे. परिणामी आता नगपरिषदेकडे सामान्य निधी उपलब्ध नाही. २०१७-१८ मध्ये कंत्राटदारांनी केलेल्या कामांची देयके अद्याप निघाली नाही. दोन कोटींच्या घरात थकबाकी आहे. अशातच चालू आर्थिक वर्षातील कामांच्या निविदा प्रक्रिया झाल्या आहे. मात्र ही कामे करायची की, नाही अशा स्थितीत कंत्राटदार आहे.नगरपरिषदेने टीबी हॉस्पिटल जागेसाठी ४५ कोटींचा भार अंगावर घेतला आहे. याशिवाय बेंबळा पाणीपुरवठा योजनेच्या अतिरिक्त रकमेच्या निविदेसाठी पालिकेवर आर्थिक भार आहे. शिवाय शहरातून जाणाऱ्या १३ किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्याचे हस्तांतरण करून घेतले. त्यामुळे याच्या देखभाल दुरुस्तीचाही भार पडला आहे. घनकचºयाची निविदा प्रक्रिया दोन वर्षांपासून न केल्यामुळे १४ वित्त आयोगाचा निधी असतानाही सामान्य निधीतूनच खर्च करावा लागत आहे.नगपरिषदेकडे कराच्या स्वरूपात येणारा पैसा इतर कामावरच खर्च होत आहे. त्यामुळे कधी नव्हे इतकी आर्थिक दिवाळखोरी वाढली आहे. कंत्राटदारांची देयके देण्यासाठी पैसा नसताना पालिकेने नवीन दहा कोटींची कामे मंजूर केली आहे. त्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. यामध्ये बड्या कंत्राटदारांना २० टक्के कमी दराची निविदा भरली आहे. ज्या कामावर पैसे उपलब्ध आहेत. ती कामे त्यांनी लाटली आहेत. तर नियमित पालिकेत काम करणाºया कंत्राटदाराकडे पैसे नसलेलीच कामे हाती लागली. आता थकबाकीमुळे नवीन कामे करायची नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.पालिकेत १५ कंत्राटदार अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. पूर्वी अती महत्वाची कामे विश्वासाने केली जात होती. त्याची देयकेसुध्दा सहज निघत होती. आता पैसाच नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. नगरपरिषदेची आर्थिक दिवाळखोरीमुळे सर्वच क्षेत्रात नामुष्की होत आहे.नगरपरिषदेने मार्चपर्यंत करवसूलीतून गोळा केलेली रक्कम टीबी हॉस्पिटल जागेच्या हप्त्यापोटी शासनाकडे जमा करावी लागणार आहे. त्यामुळे पालिका सामान्य फंडात ठणठणाट राहण्याची शक्यता पालिका वर्तुळातूनच वर्तविली जात आहे. याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होणार आहे.आज स्थायी समितीची सभानगपरिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये बांधकाम विभागातील विविध कामांना मंजूरी दिली जाणार आहे. समितीपुढे चर्चेसाठी एकूण ३३ विषय येणार आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाYavatmalयवतमाळ