शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
4
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
5
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
6
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
7
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
8
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
9
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
10
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
11
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
12
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
13
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
14
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
15
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
16
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
17
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
18
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
19
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
20
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार

CoronaVirus News in Yavatmal: किराणा किटच्या वादावरून शिवसेना खासदाराच्या स्विय सहाय्यकाच्या घरावर महिलांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 14:15 IST

शिवसेनेच्या दोन गटात पेटला वाद

नेर (यवतमाळ): नेर तालुक्यात खासदार भावनाई गवळी यांनी पाठवलेल्या किटवरुन नेर येथे शिवसेनेत राजकारण पेटल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. भावना गवळी यांचा नेर तालुक्याचा कारभार बघणारा स्वीय सहाय्यकाच्या घरावर काल सायंकाळी महिला  व नागरिकांचा मोर्चा नेला. या नागरिकांना पोलिसांनी पांगवले.लॉकडाऊनमध्ये गरजूंसाठी खासदारांकडून आणण्यात आलेल्या किट नेमक्या कुणासाठी व कुठे वाटल्या यावरून हा वाद झाला. नेर तालुक्यातील गरजुंना किराणा किट म्हणून भावना गवळी यांनी २७५ किट पाठवल्या. या किट स्थानिक छत्रपती नगरसाठी आल्याच्या कारणावरून या परिसरातील शिवसैनिकांनी खासदाराचे स्वीय साहाय्यक नितिन खैरे यांना विचारणा केली. मात्र खैरे यांनी या किट गरजूंमध्ये वाटल्या. त्या छत्रपती नगरसाठी नव्हत्या असे सांगितले. मात्र तोपर्यंत  किट आल्याची माहिती छत्रपती नगर परिसरात पोहोचली व शंभर ते दीडशे नागरिकांचा जमाव खैरे यांच्या घरावर आला व किटची मागणी केली. यावेळी खासदारांच्या विरोधात घोषणाही झाल्या व खैरे यांना धक्काबुक्कीही झाली. यामुळे नेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना हा जमाव पांगवला. याबाबत खैरे यांनी पोलिसात तक्रार करत असल्याचे सांगितले. तर गवळी यांनी पोलीस अधिक्षकांना फोन करून माहिती दिली. या घटनेचा अधिक तपास नेर पोलीस करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाBhavna Gavliभावना गवळी