शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील गुद्दलपेंडी खेळावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 10:08 IST

Yawatmal news  संपूर्ण महाराष्ट्रात फक्त यवतमाळ जिल्ह्यातील  वणी येथे रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी गुद्दलपेंडी हा दमदार मारामारीचा खेळ खेळण्यात येतो, मात्र कोरोना वायरसमुळे गुद्दलपेंडी हा अनोखा खेळ होणार नसल्याने सर्व खेळाडू व रसिक निराश झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ :  संपूर्ण महाराष्ट्रात फक्त यवतमाळ जिल्ह्यातील  वणी येथे रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी गुद्दलपेंडी हा दमदार मारामारीचा खेळ खेळण्यात येतो, मात्र कोरोना वायरसमुळे गुद्दलपेंडी हा अनोखा खेळ होणार नसल्याने सर्व खेळाडू व रसिक निराश झाले आहेत. 

संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं, मैदानामध्ये दोरीच्या दोन्ही बाजुंला स्पर्धक, व्हिसल वाजताच एका हाताने दोर पकडून दुस-या हाताने प्रतिस्पर्ध्यांना ठोसे लावणे सुरू. मैदानात फक्त थरार. प्रेक्षकांचा जल्लोष शिगेला. कोण दोर सोडेल याची उत्कंठा शिगेला. अखेर एक स्पर्धक दोर सोडतो आणि पराभव स्वीकार करतो.   हा रोमांचक आणि थरारक खेळ आहे गुद्दलपेंडी. जो केवळ धुलीवंदनालाचं खेळला जातो आणि महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी खेळला जातो ते गाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातले  वणी. ही लढत दोन ते पाच मिनिटांपर्यंत चालते. विजयी व पराभूत झालेला स्पर्धक एकमेकांची गळाभेट घेतात आणि ती लढत तिथे संपते.  

हा खेळ तसा मारधाड आणि ऍक्शनचे भरपूर आहे. मारामारीत बदले की आग वगैरे ही आहे. पण हा जरी मारधाड करण्याचा खेळ असला तरी याचा उद्देश मात्र वैर संपवणे आहे. पूर्वी एकमेकांशी वैर असले की ते लोक गुद्दलपेंडीत लढायचे. ठोसे लगावून एकमेंकांवरचा पूर्ण राग काढायचे. जसा चित्रपटात मारधाड नंतर शेवट गोड होतो, तसाच या खेळात लढत संपली की गळाभेट घेऊन लढतीसोबतच वैरही संपवलं जातं.मागील वर्षीही कोरोनाच्या सावटामुळे हा अनोखा खेळ रद्द करण्यात आला होता आणि यावर्षीही कोरोनामुळे रद्द झाल्याने खेळाडू आणि रसिकांमध्ये नाराजी आहे .

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस