शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरस ३० अंश तापमानात नष्ट होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:46 IST

कोरोना व्हायरस २८ डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. विदर्भात सध्याचेच तापमान ३० डिग्रीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळाभर तरी या व्हायरसचा विदर्भाला धोका नाही.

ठळक मुद्देआरोग्य सचिवांची माहितीविदर्भात धोका कमीच, गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सूचना

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जगाला सळो की पळो करून सोडणारा कोरोना व्हायरस २८ ते ३० डिग्री तापमानातच जिवंत राहू शकत नाही, उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे फार घाबरण्याचे कारण नाही. केवळ पावसाळा व हिवाळ्यात दक्षता घ्यावी लागेल. सध्या गर्दीची ठिकाणे टाळावी लागेल. ही माहिती खुद्द राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिवांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. या कॉन्फरन्सिंगमध्ये मुंबईहून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास तर यवतमाळात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण प्रामुख्याने सहभागी झाले होते.सचिव डॉ. मुखर्जी यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना सांगितले की, कोरोना व्हायरस २८ डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. विदर्भात सध्याचेच तापमान ३० डिग्रीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळाभर तरी या व्हायरसचा विदर्भाला धोका नाही. यावेळी त्यांनी प्रशासनाने व नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी याच्या टिप्सही दिल्या. त्यानुसार नागरिकांनी थंड व कोंदट ठिकाणी गर्दी करणे टाळावे. शिंकताना, खोकताना रूमाल अथवा टिश्यूपेपर वापरण्याची दक्षता घ्यावी. सर्दी, खोकला असणाºया व्यक्तीपासून तीन फूट अंतर राखावे. नियमित सर्दी-खोकला राहात असल्यास तपासणी करून घ्यावी. केवळ बाहेर देशातून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे, त्यांची आरोग्य तपासणी करावी, कायम त्यांच्यावर फोकस ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना