शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहरामध्ये कोरोना विषाणूचे तांडव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देरविवारी १५ रुग्णांची भर : १२० नागरिकांची रॅपिड टेस्ट, १४० जण क्वारंटाईन, ५२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व परिसरात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. एकट्या रविवारी १५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली. तर एकूण बाधितांची संख्या ७० झाली आहे. बाधितांच्या संपर्कातील १४० नागरिक क्वारंटाईन आहे.रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. शनिवारी उशिरा रात्री ८ जणांचे तर रविवारी ७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. रामनगरमधील १०० व पत्रे ले-आऊटमधील २८ अशा १२८ जणांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले. तंत्रज्ञ पंकज आडे, भाऊ वाघमारे, स्वाती फुके, शिव डाखोरे आदींचे पथक ही तपासणी करीत आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने प्रशासनावरील ताणही वाढत आहे. नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे. मात्र अनेकजण अद्यापही बिनधास्त वावरताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात कठोर उपाययोजनांची गरज आहे.दुकाने उघडू नयेकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलावे. भाजीपाला, दूध, फळे आणि किराणा दुकाने उघडण्यापूर्वी टेस्ट करण्यात यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करीत आहे. दरम्यान, २१ ते २५ जुलैपर्यंत शहरातील कापड व रेडीमेड दुकाने बंद राहणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय गजबी, सचिव नरेंद्र माजरा यांनी सांगितले आहे.तिन्ही आमदार लॉकडाऊनसाठी आग्रहीआमदार इंद्रनील नाईक, आमदार अ‍ॅड.नीलय नाईक आणि आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यातून त्यांनी सात ते १० दिवसांचा कठोर लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी केली. या पत्रावरून सात ते दहा दिवसांच्या लॉकडाऊनसंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या