शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोनाने घात केला, हाती आले ऑटोरिक्षाचे स्टेअरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 05:00 IST

अरुणा जाधव यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेलं. पतीच्या निधनानंतर त्या ऑटोरिक्षा शिकल्या. आज या व्यवसायातून दररोज २०० ते ३०० रुपये मिळतात. त्यांची मोठी मुलगी अमृता आठव्या वर्गात शिकते. अर्पिता, उत्कर्ष, यश आणि अंगणवाडीत शिकणारा आदर्श या पाच जणांसह स्वत:चा उदरनिर्वाह ती करते. मदतीसाठी अनेकांनी आश्वासने दिली. मात्र, अजूनतरी कुठल्या राजकीय पुढाऱ्यांकडून मदतीचा हात मिळाला नाही. उपजीविकेचा ऑटोरिक्षा हाच योग्य मार्ग असल्याचे त्या सांगतात. 

किशोर वंजारीलोकमत न्यूज नेटवर्कनेर : सुखासमाधानाच्या संसाराला कोरोनाची दुष्ट लागली. पाच मुले आणि ती उघड्यावर आली. चरितार्थ चालविण्याची चिंता लागली. पण हरली नाही. पतीच्या व्यवसायाला पुढे नेण्याचा निर्धार केला. हाती ऑटोरिक्षाचे स्टेअरिंग घेतले. होणाऱ्या कमाईतून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परजना गावातील स्वाभिमानी असलेल्या अरुणा समाजासाठी प्रेरणावाट ठरली आहे.      नेर तालुक्यातील परजना गावातील अशोक जाधव (४०) यांचा एप्रिल २१मध्ये कोरोनाने बळी घेतला. ऑटोरिक्षा चालवून ते उपजीविका करायचे. त्यांच्या अकाली मृत्यूने पत्नी अरुणा अशोक जाधव (३१) हतबल झाली. जगण्याचा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला. शेतमजुरी करून पाच लेकरांसह स्वत:चे पोट कसे भरायचे ही चिंता तिला लागली.मात्र, धीर सोडला नाही. पतीचा ऑटोरिक्षा चालवण्याचा निर्णय तिने घेतला. आता ती दररोज परजना ते नेर मार्गावर प्रवासी ऑटोरिक्षा चालविते. अरुणाच्या धाडसाची दखल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष मनीषाताई काटे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका  अध्यक्ष सुनील  खाडे   यांनी घेतली. थेट खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी संवाद करून दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील ४६० कुटुंबातील मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी घेतली. यात त्यांनी अरुणा जाधव यांच्या मुलांचाही समावेश करून घेण्यासाठी अहवाल पाठविला. मात्र, सध्यातरी अरुणासमाेर ऑटोरिक्षा चालवून पोट भरण्याशिवाय पर्याय नाही.

पतीच्या निधनानंतर शिकल्या ऑटोरिक्षाअरुणा जाधव यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेलं. पतीच्या निधनानंतर त्या ऑटोरिक्षा शिकल्या. आज या व्यवसायातून दररोज २०० ते ३०० रुपये मिळतात. त्यांची मोठी मुलगी अमृता आठव्या वर्गात शिकते. अर्पिता, उत्कर्ष, यश आणि अंगणवाडीत शिकणारा आदर्श या पाच जणांसह स्वत:चा उदरनिर्वाह ती करते. मदतीसाठी अनेकांनी आश्वासने दिली. मात्र, अजूनतरी कुठल्या राजकीय पुढाऱ्यांकडून मदतीचा हात मिळाला नाही. उपजीविकेचा ऑटोरिक्षा हाच योग्य मार्ग असल्याचे त्या सांगतात. 

अरुणा जाधव हिला मदत करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. मुलांचे पालकत्व स्वीकारून या कुटुंबाची काळजी घेतली जाईल. - मनीषाताई काटे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस

 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या