शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

कोरोनाने रोखला आणखी १३ जणांचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

कोरोना मृतांमध्ये यवतमाळ शहरातील ३९ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, तालुक्यातील ४५, ५५, ८० वर्षीय पुरुष, नेर येथील ४० वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील ५५ वर्षीय दोन पुरुष व ३२ वर्षीय महिला, मानोरा जि. वाशिम येथील ६८ वर्षीय पुरुष, वर्धा येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. बुधवारी पाॅझिटिव्ह आलेल्या ७९० जणांमध्ये ४६० पुरुष, ३३० महिला आहेत.

ठळक मुद्दे७९० नवे पाॅझिटिव्ह रुग्ण : जिल्ह्यात आत्तापर्यंतचे सर्वाधिक ४ हजार ६२ ॲक्टिव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका आता कहर बरसवत आहे. जिल्ह्यात २४ तासात ७९० नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. १३ जणांचा कोरोनाने श्वास रोखला आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. चार हजार ६२ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आरोग्य यंत्रणेवर दररोज वाढत्या रुग्णांचा ताण पडत असून ऑक्सिजन, रेमडेसिविर व इतरही काही औषधांची चणचण भासायला लागली आहे. प्रशासनाला दररोज नियोजन करावे लागत आहे. कोरोना मृतांमध्ये यवतमाळ शहरातील ३९ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, तालुक्यातील ४५, ५५, ८० वर्षीय पुरुष, नेर येथील ४० वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील ५५ वर्षीय दोन पुरुष व ३२ वर्षीय महिला, मानोरा जि. वाशिम येथील ६८ वर्षीय पुरुष, वर्धा येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. बुधवारी पाॅझिटिव्ह आलेल्या ७९० जणांमध्ये ४६० पुरुष, ३३० महिला आहेत. त्यात यवतमाळातील २६१, दारव्हा येथील ९७, पुसद येथील ८५, उमरखेड ६२, पांढरकवडा ५९, कळंब ४९, वणी ४६, बाभूळगाव ३३, दिग्रस ३३, महागाव २५, आर्णी १२, मारेगाव १०, झरी ५, राळेगाव ३, नेर २ आणि इतर शहरातील आठ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी तीन हजार ३७६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात ७९० नमुने पाॅझिटिव्ह आले. दोन हजार ५८२ नमुने निगेटिव्ह आले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांची संख्या दोन हजार १५३ वर पोहोचली आहे. गृहविलगीकरणात असलेल्यांची संख्या एक हजार ९०९ झाली आहे. आतापर्यंत एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ३६ हजार ३८१ इतकी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही ३१ हजार ५२४, कोरोनाने आतापर्यंत ७९५ जणांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर हा ११.२३ तर मृत्यूदर हा २.१९ इतका आहे. सातत्याने रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे.  

 खासगी कोविडमध्ये दीडशे खाटांना नव्याने मान्यता  जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. १७ खासगी कोविड सेंटरवर असलेले ५१५ बेडही अपूर्ण पडत आहे. शासकीय कोविड सेंटरमध्येही अशीच अवस्था आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. तरंगतुषार वारे यांनी तातडीने निरीक्षण करून नव्या दीडशे बेड्सना मान्यता दिली आहे. तर चार नवीन खासगी कोविड सेंटरला मान्यता दिली जाणार आहे. यात यवतमाळात दोन, वणी एक, उमरखेड एक येथील कोविड सेंटरचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या