लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच आहे. त्यातच मंगळवारी कोरोनामुळे आणखी २५ जणांचा जीव गेला. तर जिल्ह्यात एक हजार नागरिकांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला आहे. तर जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही सात हजारांच्यावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११८२ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६४, ६५, ७२, ७५ वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील ५३ वर्षीय पुरुष, नेर येथील ७७ वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील ४० व ६० वर्षीय पुरुष, केळापूर येथील ४५ वर्षीय पुरुष व ४९ वर्षीय महिला, कळंब येथील ६० व ७५ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ७७ वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ६०वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील ७८ वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, आर्णी शहरातील ५० वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील ६७ वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील ७० वर्षीय महिला आणि वर्धा येथील ६४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पुसद येथील ६९ वर्षीय पुरुष तर खासगी रुग्णालयात यवतमाळ येथील ५२ व ६६ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ७३ वर्षीय पुरुष, वणी येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मंगळवारी पाॅझिटिव्ह आलेल्या एक हजार जणांमध्ये ५९३ पुरुष तर ४०७ महिला आहे. यात यवतमाळ येथील ३०१, मारेगाव ११०, घाटंजी १०६, पांढरकवडा ८०, दिग्रस ७०, पुसद ६६, वणी ५३, नेर ४९, बाभूळगाव ४२, आर्णी ३३, झरी ३०, कळंब २२, महागाव ११, दारव्हा १०, उमरखेड ९, राळेगाव २ तर अन्य शहरातील सहा रुग्णांचा समावेश आहे. तीन लाख ९३ हजार ८१८ अहवाल आले असून ६०२९ अप्राप्त आहे. तीन लाख ४३ हजार ६८६ नमुने निगेटिव्ह आले.
४१ हजार ७९२ रुग्ण झाले कोरोनामुक्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पाच हजार ६०८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४६०८ निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात सात हजार १५८ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. त्यातील दोन हजार ६९० जण रुग्णालयात भरती आहे. तर चार हजार ४६८ रुग्ण गृहविलगीकरणात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजार १३२ झाला. मंगळवारी ५२० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४१ हजार ७९२ झाली आहे.
मंगळवारी २० जणांचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला.चार मृत्यू खासगी रुग्णालयात तर एक मृत्यू डीसीएचसीमध्ये झाला. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी तर १२.५४ तर मृत्यू दर २.३६ आहे.