शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कोरोनाने केला ३० जणांवर वार, ८६३ नवीन रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

कोविड रुग्णासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोविड नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या सनियंत्रणाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये २४ बाय ७ कक्ष सुरू राहणार आहे. यासाठी ०७२३२-२४०७२०, २४०८४४, २५५०७७ या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्दे८८० कोरोनामुक्त : शासकीय कोविडमध्ये सर्वाधिक मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूने बुधवारी ३० जणांवर वार करीत त्यांचा बळी घेतला. २४ तासामध्ये शासकीय कोविड रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाला तर खासगी रुग्णालयात चार, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ८६३ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यामुळे एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ५० हजार ९९५ वर पोहोचली आहे. ८८० जणांनी कोरोनावर मात केल्याने एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४२ हजार ६७२ इतकी झाली आहे. आतापर्यंत एक हजार २१२ जणांचा कोरोनाने श्वास रोखला आहे. जिल्ह्यातील पाॅझिटिव्हिटी दर हा १२.५८ इतका आहे. मृत्यूदर २.३८ इतका आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६०, ५७, ५४, ६३ वर्षीय पुरुष व ५१, ७०, ६८ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील ३५, ५२ वर्षीय पुरुष, घाटंजी शहरातील ८०वर्षीय पुरुष, वणी येथील ५० वर्षीय पुरुष, ६० व ७० वर्षीय महिला, तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला, बाभूळगाव तालुक्यातील ६६ वर्षीय पुरुष, राळेगाव येथील ४०वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ५५ वर्षीय महिला, केळापूर तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष, आर्णीतील ४२ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ५५ वर्षीय महिला, नेर तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दिग्रस येथे ७० वर्षीय पुरुष, घाटंजी ४५ वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात दारव्हा येथील ६७ वर्षीय पुरुष, उमरखेड येथील ६५ वर्षीय महिला, पुसद येथील ७०वर्षी पुरुष, पांढरकवडा येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या ८६३ जणांमध्ये ५२५ पुरुष आणि ३३८ महिला आहे. यात सर्वाधिक यवतमाळ शहरातील १६३ आहेत. पांढरकवडा १०४, घाटंजीतील ६९ जणांचा समावेश आहे. 

कोरोना नियंत्रण कक्षातून २४ तास मिळणार मदत  कोविड रुग्णासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोविड नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या सनियंत्रणाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये २४ बाय ७ कक्ष सुरू राहणार आहे. यासाठी ०७२३२-२४०७२०, २४०८४४, २५५०७७ या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या कक्षात खासगी कोविड रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिविर व बेडची उपलब्धता याबाबत मदत केली जाईल.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या