शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राकाँचे सदस्य फोडण्याची व्यूहरचना

By admin | Updated: March 17, 2017 02:31 IST

जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना व भाजपा हे दोनही पक्ष कामाला लागले आहेत.

संख्याबळाची जुळवाजुळव : शिवसेना, भाजपा लागली कामाला, घोडेबाजार-देवदर्शनाची चिन्हे यवतमाळ : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना व भाजपा हे दोनही पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेत सोबत घेणे किंवा सत्तेसाठी त्या पक्षाचे कायद्याच्या चौकटीत राहून सदस्य फोडणे अशी व्यूहरचना केली जात आहे. विशेष असे, पद शाबूत राहत असेल तर काहींनी फुटण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचारही चालविल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेमध्ये २० जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेची शिवसेनेची इच्छा नाही. भाजपाने खेळलेली ‘शिवसेनेचा पालकमंत्री हटाव’ ही खेळी शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली आहे. या खेळीमुळे आता भाजपाची अडचण झाली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा विचार करीत आहे. अशीच खेळी भाजपाकडून काँग्रेसला सोबत घेऊन खेळली जाण्याची शक्यता असली तरी तसे करूनही त्यांचे संख्याबळ जुळणार नाही. सदस्यांना देवदर्शन घडविणार म्हणूनच काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य फुटू शकतात का या दृष्टीने भाजपा व शिवसेनेने चाचपणी चालविल्याची माहिती आहे. या दोनही पक्षाचे प्रत्येकी ११ सदस्य आहेत. पक्षांतर बंदी कायद्यातून सुटका करून घ्यायची असेल तर किमान चार ते पाच सदस्य एकाच वेळी बाहेर पडणे गरजेचे आहे. एखादवेळी या सदस्यांना आजाराचे कारण दाखवून सभागृहात गैरहजरही ठेवता येईल का याचा विचार केला जात आहे. काँग्रेसमध्ये एकजूटीचे आव्हान जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी सर्वश्रृत आहे. जिल्हा परिषदेचे निवडून आलेले ११ सदस्य वेगवेगळ्या नेत्यांच्या गटात विखुरले गेले आहेत. त्यामुळे या सदस्यांची एकजूट कायम राखण्याचे आव्हान काँग्रेसच्या नेत्यांपुढे राहणार आहे. हे सदस्य भाजपा अथवा शिवसेनेच्या गळाला लागल्यास काँग्रेसच्या नेतृत्वाची क्षमता उघडी पडण्यास वेळ लागणार नाही. हे सदस्य फुटल्यास ते पक्षालाच नव्हे तर नेत्यालाही मानत नसल्याचे सिद्ध होईल. राष्ट्रवादीच्या सदस्यांवर फेकले जाळे अशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. राष्ट्रवादीच्या पुसद या बालेकिल्ल्यात भाजपाने आधी अ‍ॅड. निलय नाईकांना पक्षात आणून व आता जिल्हा परिषदेचे दोन सदस्य निवडून आणून आधीच सुरुंग लावला आहे. आता राष्ट्रवादीच्या ११ सदस्यांपैकी कुणी गळाला लागतो का यासाठी भाजपाकडून जाळे फेकले जात असल्याचे सांगितले जाते. सभापतीपद व पैशाचा पर्याय ठेऊन ऐनवेळी देवदर्शनाला निघून जाण्याची आॅफर राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसच्याही सदस्यांपुढे ठेवली जात आहे. या आमिषाला काँग्रेस, राष्ट्रवादीतील कुणी बळी पडतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपा, सेना सदस्यांवरही वॉच याच निकषावर भाजपा व शिवसेनेने एकमेकांच्या पक्षातही कुणी फितूर होतो का याच्या तपासणीसाठी व्युहरचना चालविल्याची माहिती आहे. क्रॉस कनेक्शन झाले सिध्द चारही प्रमुख पक्षांचे क्रॉस कनेक्शन नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीमध्ये दिसून आले आहे. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या भाजपाने पंचायत समित्यांमधील सत्तेसाठी चक्क काँग्रेसची साथ घेतली आहे. काँग्रेसही भाजपाला क्रमांक एकचा शत्रू मानत असताना केवळ सत्तेसाठी या पक्षाच्या बाजूला बसली आहे. काँग्रेसचे सदस्य गैरहजर ठेवण्याची सेनेची खेळी यशस्वी शिवसेनेने यवतमाळ पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी काँग्रेसच्या सदस्याला गैरहजर ठेवण्याची खेळी यशस्वी केली आहे. आता हीच खेळी जिल्हा परिषदेमध्ये यशस्वी करण्यासाठी व त्यासाठी वेळप्रसंगी विरोधी पक्षाचे सदस्य फोडण्याची व्युहरचना केली गेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)