शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यक समाजाच्या हक्कासाठी अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:06 IST

राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, आॅल इंडिया एकता फोरम व राष्ट्रीय अल्पसंख्यक मोर्चाच्या वतीने पश्चिम विदर्भस्तरीय जलसाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपत्रकार परिषद : मुस्लीम, शिख, जैन, बुद्धिस्ट, लिंगायत, ख्रिश्चनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, आॅल इंडिया एकता फोरम व राष्ट्रीय अल्पसंख्यक मोर्चाच्या वतीने पश्चिम विदर्भस्तरीय जलसाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात काम सुरू असून लाखोंच्या संख्येने मुस्लीम, शिख, जैन, बुद्धिस्ट, लिंगायत, ख्रिश्चन आदी अल्पसंख्यक बांधव यात सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रीय मायनॉरिटी मोर्चातर्फे मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.हे अधिवेशन २२ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता अकोला येथील क्रिकेट क्लब, रेल्वेस्टेशन रोड येथे होऊ घातले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम राहणार आहेत. उद्घाटक आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे (नवी दिल्ली) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य हजरत मौलाना खलीलुल रहेमान सज्जाद नेमानी आहेत. मुख्य मार्गदर्शक म्हणून जमीअत-ए-उलमा हिंद देवबंदचे राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना अरशद मदनी उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा वापर करणे म्हणजे लोकशाही संपविणे होय, या विषयावर अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा होणार आहे. कॉमन सिव्हील कोडवर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण आणि वर्तमान परिस्थिती असा चर्चेचा दुसरा विषय ठेवण्यात आला आहे.महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भन्ते नागार्जुन सुरई ससाई, ख्रिश्चन धर्मगुरू बिशप डॉ. प्रदीप कांबळे, ग्रामगीता प्रचारक समितीचे सत्यपाल महाराज, बाबा बद्धानीनगर गुरुद्वाराचे माजी प्रमुख मलकीयत सिंग बल, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी प्रा. बी. एस. हस्ते, विश्व लिंगायत परिषद कर्नाटकचे कोरणेश्वर स्वामी, माजी पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे प्रभारी प्रा. विलास खरात, राष्ट्रीय जैन मोर्चाचे राज्याध्यक्ष डॉ. प्रदीप फलटने, संत गाडगे महाराज यांचे वंशज हभप हरिनारायण जानोरकर आदी विशेष अतिथी राहणार आहेत. हा मोर्चा म्हणजे अल्पसंख्यकांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन असून प्रत्येकाने तन मन धनाने यात सामील व्हावे, असे आवाहनही पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले.पत्रकार परिषदेला मन्सूर एजाज जोश, मोहम्मद अस्लम, अभिजित भगत, रेव्हरंड जयवंत तायडे, संजय सावळे, गजानन उल्हे आदी उपस्थित होते.