शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदभारावरून वादंग; माधुरी मडावी यांची पोलिसात धाव

By सुरेंद्र राऊत | Updated: September 21, 2022 15:02 IST

डोल्हारकर यांनी एकतर्फी घेतला पदभार

यवतमाळ : शहरात मागील आठ दिवसांपासून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या बदलीवरून आंदोलन पेटले आहे. मडावी यांना समर्थन देणाऱ्यांप्रमाणेच त्यांच्या विरोधात सफाई कामगारांनी आंदोलन केले होते. मंगळवारी मडावी यांची बदली झाल्याचा आदेश धडकला. त्यांच्या जागेवर कारंजा येथील  दादाराव डोल्हारकर यांना नियुक्ती मिळाली. बुधवारी सकाळी डोल्हारकर पदभार घेण्यासाठी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचले. तेथे वाद झाल्याचा आरोप माधुरी मडावी यांनी केला. तशी तक्रारच शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

माधुरी मडावी यांची सहायक आयुक्त अमरावती येथे बदली झाली. बदली आदेशातच कार्यमुक्त करीत असल्याचे नमूद होते. बदली आदेश मिळताच बुधवारी बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रमाणे दादाराव डोल्हारकर सकाळी मुख्याधिकारी यांच्या कक्षात पदभार घेण्यासाठी पोहोचले.तेथे माधुरी मडावी या सीओंच्या खुर्चीत बसून होत्या.

डोल्हारकर यांनी त्यांच्याकडे पदभाराची मागणी केली. मात्र दोन तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यामुळे स्वत:च्या घरुन खुर्ची बोलाविली व ती बाजूला ठेवून एकतर्फी पदभार घेतला, असे डोल्हारकर यांनी सांगितले. धक्काबुक्की करणे किंवा अपमानित करणे असा कुठलाही प्रकार घडला नाही. यावेळी कक्षात पोलीस व महिला कर्मचारीसुद्धा उपस्थित होत्या. पदभार घेताना कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र देणे अपेक्षित असते. मात्र ही प्रक्रिया झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

माधुरी मडावी यांनी दादाराव डोल्हारकर यांच्यासह २५ जणाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. प्रभाग सोपविण्याची प्रक्रिया करीत असताना डोल्हारकर कुठलीही परवानगी न घेता मोठी खुर्ची घेवून कक्षात बळजबरीने आले. त्यांनी ती खुर्ची माझ्या बाजूला ठेवली व तेथेच बसले. त्यांच्या वागण्याने अतिशय लज्जास्पद व अपमानकारक वाटले. या कृतीने माझ्या कामात खोळंबा निर्माण झाला. प्रभार सोपविण्याची प्रक्रिया करू दिली नाही, असा आरोप माधुरी मडावी यांनी त्यांच्या तक्रारीवरून केला आहे. दरम्यान, बदली रद्द व्हावी यासाठी मडावी यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतल्याची माहिती आहे. मात्र तेथे त्यांची याचिका सुनावणीतच निकाली काढल्याचे सांगितले जात आहे. पदभारावरून झालेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे. अन्‌ मडावींचे फलक हटले

मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नगरपरिषद कार्यालयात व इमारतीत दर्शनी भागात स्वत:चे फलक लावले होते. बऱ्याच दिवसानंतर हे फलक बुधवारी सकाळी काढण्यात आले. नवीन मुख्याधिकाऱ्यांनी पदभार घेताच तातडीने हे फलक काढण्याचे आदेश दिले. त्यावरून ही कार्यवाही झाली.राेड शो नाही कामाला प्राधान्य - डोल्हारकर

रोड शो न करता कामाला प्राधान्य दिले जाईल, सध्या सुरू असलेली सर्व कामे पूर्ण केली जाईल. नाट्यगृहाचे काम, घनकचरा व्यवस्थापन, शहरातील सौंदर्यीकरण याशिवाय इतर महत्वपूर्ण कामे मार्गी लावले जातील. लवकरच माझ्या कार्याची छबी यवतमाळकरांना दिसेल. जनसामान्यांची कामे प्राधान्याने करण्यात येईल. यवतमाळ ही माझी शैक्षणिक व कर्मभूमी आहे. जिल्ह्यातील नगर प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे येथील समस्यांची जाणीव आहे, असे दादाराव डोल्हारकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :TransferबदलीYavatmalयवतमाळGovernmentसरकार