शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

तंटामुक्त समित्यांचे गावांवरील नियंत्रण सुटले

By admin | Updated: October 15, 2015 03:01 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या व पोलीस विभागातील समन्वयाअभावी पुरस्कारप्राप्त गावात आता वाद निर्माण होत असून या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटले आहे.

पुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या व पोलीस विभागातील समन्वयाअभावी पुरस्कारप्राप्त गावात आता वाद निर्माण होत असून या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटले आहे. तसेच गावात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले असून पुरस्कारप्राप्त गावांचेच आता सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे.गावात उद्भवणाऱ्या लहानसहान तंट्यांचे मोठ्या भांडणात रूपांतर होवू नये, गावातील वाद गावातच सोडविला जावा, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, गावात सामाजिक सलोखा व शांतता टिकावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. तंटामुक्त गाव समिती आणि पोलिसांच्या सहकार्यातून अनेक गावातून अवैध व्यवसायांचे उच्चाटन झाले. गावात शांतता व सुव्यवस्था नांदू लागली. परंतु आता या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटल्याचे दिसत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करणाऱ्या तंटामुक्त समित्यांना लोकसंख्येच्या निकषावर पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार राशी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होताच तंटामुक्त समिती व नियंत्रकांचा ग्रामपंचायत कमिटीला विसर पडला. त्यांना विश्वासात न घेता सरपंच, सचिवांनी निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य खर्च करणे सुरू केले. या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांची गावावरील पकड सैल झाली. गावात पुन्हा अवैध धंदे फोफावू लागले. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय केला जात आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच मटका, जुगार, दारू आदींच्या मागे लागले आहे. यातून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गावात भानगडीही निर्माण होत आहे.पुरस्कारप्राप्त गावांचीच ही अवस्था असेल तर इतर गावांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आता पुरस्कारप्राप्त गावांचे सर्वेक्षण पुन्हा करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातून गाव समित्यांना पुन्हा ऊर्जा मिळेल आणि नव्या दमाने काम करण्याची संधी निर्माण होईल. (तालुका प्रतिनिधी)