शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

मेडिकलच्या ‘क्ष-किरण’ला रिक्तपदांचा कॉन्ट्रास्ट

By admin | Updated: December 1, 2014 23:01 IST

संतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात सर्वच प्रमुख पदे रिक्त आहेत. एकट्या विभाग प्रमुखाच्या भरोशावर येथील कारभार सुरू आहे. सोनोग्राफी आणि सीटी-स्कॅनसाठी रुग्णांना

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात सर्वच प्रमुख पदे रिक्त आहेत. एकट्या विभाग प्रमुखाच्या भरोशावर येथील कारभार सुरू आहे. सोनोग्राफी आणि सीटी-स्कॅनसाठी रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत आहे. सोनोग्राफीचा शाश्वत रिपोर्ट येथून मिळेल याची कोणतीच शाश्वती नाही. क्ष-किरण विभागातील रिक्तपदांच्या कॉन्ट्रास्टमुळे आता रुग्णांणाच रिअ‍ॅक्शन येत आहे. क्ष-किरण विभागांतर्गत एक्स-रे, सोनोग्राफी आणि सीटीस्कॅन सारख्याच्या चाचण्या केल्या जातात. डॉक्टरांची उपचाराची दिशाच येथील रिपोर्टवरून ठरते. त्यामुळे वैद्यकीय उपचारात या चाचण्यांना अनन्य साधारण महत्व आहे. येथील रिक्तपदे भरण्यासाठी कोणीच हालचाली करताना दिसत नाही. पुर्वी येथे एक सहयोगी प्राध्यापक आणि एक अधिव्याख्यात कार्यरत होते. आकृतिबंधानुसार येथे दोन सहयोगी प्राध्यापक आणि दोन अधिव्याख्यात्यांची पदे मंजुर आहेत. मात्र आज या विभागात एकही सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्यात नाही. विभागप्रमुखालाच संपूर्ण धुरा सांभाळावी लागत आहे. रिक्तपदामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. रुग्णांचे रिपोर्ट तयार करण्यास वेळ दिल्यानंतर विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते. अध्यापनावर भर दिल्यास रुग्णांची रांग वाढत जाते. बरचेदा अपघाती रुग्णांचा तातडीने रिपोर्ट द्यावा लागतो, ही कसरत करताना ओढताण होत आहे. ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सातत्याने या विभागात चकरा माराव्या लागतात. रिक्तपदामुळे रुग्णसेवेत अडसर निर्माण झाला आहे. शिवाय ही रिक्तपदे वेळत भरली गेली नाही तर भारती आयुर्विज्ञान परिषदेकडून अभ्यासक्रमाला मान्यता मिळविताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. यापूर्वीच रिक्तपदामुळे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने मान्यता नाकारल्याची नामुष्की महाविद्यालयावर ओढवली होती. वेळेत तडजोड केल्यामुळे एमबीबएसच्या जागा कायम राहिल्यात. आता येथे शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याने काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वैद्यकीय महाविद्यालयात क्ष-किरण विभागासोबतच इतर विभागांंना रिक्त पदांचा आजार जडला आहे. मात्र या प्रश्नाकडे कुणी लक्ष द्यायला तयार दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)