शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

कंत्राटदारांचे नवे जेसीबी आरटीओत नोंदच नाही

By admin | Updated: September 3, 2015 02:11 IST

जिल्ह्यात नव्याने खरेदी केलेल्या जेसीबींची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नोंदणीच झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. हे बहुतांश जेसीबी कंत्राटदारांचे आहेत.

पासिंगशिवाय वापर : जलयुक्त शिवारमधून फुटले बिंग, कर बुडतोययवतमाळ : जिल्ह्यात नव्याने खरेदी केलेल्या जेसीबींची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नोंदणीच झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. हे बहुतांश जेसीबी कंत्राटदारांचे आहेत. २८ कोटींच्या जलयुक्त शिवारच्या कामांमधून अनेक गैरप्रकार पुढे येत आहेत. बनावट नंबर व आरसी बूकच्या माध्यमातून पासिंग झालेले जेसीबी जलयुक्तच्या कामावर वापरले गेले आहेत. या कामात अनेक ठिकाणी बराच गोंधळ आहे. त्यामुळेच या कामांची देयके प्रशासनाने रोखली आहेत. काही ठिकाणी चांगली कामे झाल्याचा व अपेक्षेनुसार त्यात पाणी साठल्याचा अपवादही आहे. मात्र यातून अनेक गैरप्रकारांचे बिंगही फुटत आहे. नव्या जेसीबींची आरटीओ कार्यालयात नोंदणीच नसल्याचा असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. कंत्राटदार बनलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जेसीबी खरेदी केले आहेत. कुणी नागपूरसारख्या शहरातून मोठ्या कंत्राटदारांचे जुने जेसीबी आणले आहेत, तर अनेकांनी नवे जेसीबी खरेदी केले. जुन्या जेसीबींची आरटीओत नोंद आहे. मात्र नवे जेसीबी पासिंगशिवाय पर्यायाने नंबरशिवाय चालत आहेत. बहुतांश जेसीबींवर नंबर दिसत नाही. त्यामागील कारणे शोधली असता त्याचे पासिंगेच झाले नाही तर नंबर मिळणार कोठून, असे सांगण्यात आले. नियमानुसार ३५ सीसीच्यावर आणि टायरव्हील असलेल्या प्रत्येक वाहनाला आरटीओचे रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे. मात्र हा नियम डावलून सर्रास विनानंबरचे जेसीबी शासकीय कामांवर सुरू आहे. कंत्राटदार व शासकीय अधिकाऱ्यांच्या ‘सेटिंग’मधून हा प्रकार चालविला जात आहे. यातील बहुतांश जेसीबी हे पुसद, उमरखेड, महागाव, वणी या तालुक्यांमध्ये असल्याचीही माहिती आहे. जेसीबी वैयक्तिक नावाने असेल तर चार टक्के कर भरावा लागतो आणि तो संस्थेच्या-ट्रस्टच्या नावाने असेल तर सहापट कर भरावा लागतो. म्हणून बहुतांश संस्था वैयक्तिक नावाने हे जेसीबी दाखवितात. यातून शासकीय संस्थाही सुटलेल्या नाहीत. प्रमुखाच्या नावाने हे जेसीबी दाखवून कर वाचविला जातो. शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये नोंदणी झालेल्या व प्रत्यक्ष कामावर सुरू असलेल्या जेसीबींच्या खरेदीची तारिख तपासल्यास ‘विनानंबर - विनापासिंग’ जेसीबीमुळे शासनाचा किती कर बुडाला हे सिध्द होईल. (जिल्हा प्रतिनिधी)पुसद, दारव्ह्याच्या एजंटांनी ‘आरटीओ पोखरले’पुसद व दारव्हा येथील दोन एजंटांनी यवतमाळचे डेप्युटी आरटीओ कार्यालय पोखरल्याचे सांगितले जाते. त्यांच्याच मार्फत आरटीओच्या अपरोक्ष, तर कधी आरटीओतील यंत्रणेच्या साक्षीने अनेक नियमबाह्य कामे मार्गी लावली जातात. कंत्राटासाठी बोगस सही-शिक्क्याद्वारे आरसी बुक तयार करण्याचे प्रकार सर्वाधिक आहेत. यवतमाळचे डेप्युटी आरटीओ श्याम झोळ अशा प्रकरणांचा स्वत:हून पुढाकार घेऊन छडा लावण्याऐवजी खुलाशात धन्यता मानत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यवतमाळ आरटीओ कार्यालयाच्या साक्षीने जिल्हाभरात सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, पासिंगमधील गोंधळ, पिंपळखुटी चेकपोस्टवरील आर्थिक उलाढाल अशा विविध प्रकरणांची ‘कुंडली’च ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.