लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहरात नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.शहरात ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. या पाईप लाईनजवळील खड्ड्यांमध्ये दूषित पाणी साचते. त्याच पाण्याचा शिरकाव पाईपलाईनमध्ये होतो. त्यातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही पालिकेने कोणतीही उपाययोजना केली नाही.दिग्रसमध्ये आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यातही गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. या पाण्याला उग्रवास येतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. संतापाचा स्फोट होण्याची शक्यता बळावली आहे. यातून आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.आमदारांनी लक्ष द्यावेपालिकेचे पाणीपुरवठा सभापती आपल्या कंत्राटदारीतच व्यस्त आहे. आरोग्य अधिकारीही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आमदारांनीच या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिग्रस शहरात दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST
पाण्याचा शिरकाव पाईपलाईनमध्ये होतो. त्यातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही पालिकेने कोणतीही उपाययोजना केली नाही.
दिग्रस शहरात दूषित पाणीपुरवठा
ठळक मुद्देनगरपरिषदेचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये असंतोष, आरोग्य धोक्यात