शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील नाईक सुतगिरणीचा कंटेनर सातासमुद्रापार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 14:52 IST

Yawatmal News cotton पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक गिरणीने भरारी घेतली असून गुणवत्तापूर्ण सुताची चीन व हॉंगकॉंग देशात निर्यात होत आहे.

ठळक मुद्देविदर्भात एकमेव सहकारी सूतगिरणीची विकासाकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: विदर्भात एकमेव सहकारातील सुरू असलेल्या बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीचे भविष्य अंधकारमय दिसत असतानाच नव्याने पदारूढ झालेल्या अध्यक्ष व संचालक मंडळाने सूतगिरणीला सुगीचे दिवस आणलेले दिसत आहे. नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे  गिरणीतील सुताची निर्यात सातासमुद्रापार पोचली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सूतगिरणीची चाके ठप्प झाली. मात्र, 'अनलॉक' होताच सुत उत्पादनात गिरणीने भरारी घेतली असून गुणवत्तापूर्ण सुताची चीन व हॉंगकॉंग देशात निर्यात होत आहे. सूतगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेगावकर व  माधुरी आसेगावकर यांनी पूजन करून शनिवार ता. ३१ रोजी सुताचे पहिले दोन कंटेनर मुंबई बंदरासाठी रवाना केले.बाबासाहेब नाईक सूतगिरणीत उपलब्ध असलेल्या टीएफओ या अद्ययावत यंत्रावर तयार करण्यात आलेल्या १६ काऊंटच्या सुतास मंदीच्या काळातही मोठी मागणी आहे. एकूण दहा कंटेनरद्वारा २०० टन सुताची मागणी चीन व हॉंगकॉंग या देशातून नोंदविण्यात आली. ज्यादा भाव मिळत असल्याने गिरणीने सुत निर्यातीला प्राधान्य दिले व कोरोना काळातही गिरणीने एक पाऊल पुढे टाकले. संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री मनोहर नाईक, गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक एम.आय. पाथरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे लॉकडाऊन नंतर तीन पाळ्यात पूर्ण क्षमतेने सूत उत्पादन सुरू आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सहभागातून ८९ टक्के उत्पादन क्षमतेचा वापर होत आहे.

केवळ सुत निर्मितीवर निर्भर न राहता पूरक उत्पादनांवर सूतगिरणीचा भर राहणार आहे. यासाठी यवतमाळ जिल्हा सूत व कापड गिरणी पुसद येथे नाईक सूतगिरणीच्या युनिट- २ चा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर दोन बैठकी झाल्या असून उच्च तंत्रज्ञानावर आधारित जपान मशीन द्वारे टी-शर्ट, लॅक्रान, हॅन्ड ग्लोज, मास्क निर्मिती करण्यात येईल. याद्वारे चारशे कामगारांना रोजगार मिळेल.- ययाती नाईकउपाध्यक्ष, बाबासाहेब नाईक सूतगिरणीसध्या सूतगिरणीचा विजेचा खर्च जास्त आहे. तो वाचविण्यासाठी २.५ मेगावॅट क्षमतेचा सोलर प्रोजेक्ट प्रस्तावित आहे. तो मंजूर झाल्यास विज खर्चात मोठी बचत होईल. कोविडच्या काळातील कामगिरी पाहून वस्त्रोद्योग आयुक्त तसेच एनसीडीसी दिल्ली या संस्थेने सूतगिरणीला कर्जाच्या पुनर्रचनेत सबसिडी दिली आहे. सुताला विदेशातून मागणी येत आहे. सूतगिरणीच्या सुताला मिळालेली ही पावती आहे.- राजेश आसेगावकरअध्यक्ष, बाबासाहेब नाईक सूतगिरणी

टॅग्स :cottonकापूस