व्यापारी दिवसेंदिवस श्रीमंत आणि शेतकरी दिवसेंदिवस अधिक गरीब होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासोबत ग्राहकांना वाजवी दरात चांगले धान्य मिळावे, शेतकर्यांना दोन पैसे जास्त मिळावे यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने पहिला धान्य महोत्सव आयोजित केला आहे. त्या ठिकाणी थेट शेतकर्यांनाचा निमंत्रित करण्यात आले आहे. शेतकरी वर्षभर आपल्या शेतात राबराब राबतो, मात्र त्याला त्याच्या घामाचा मोबदला मिळत नाही. बाजारात धान्य जाताच शेतमालाचे दर कोसळतात. शेतकर्यांकडून कमी दरात शेतमालाची खरेदी होते आणि अधिक दरात ते ग्राहकांना विकल्या जाते. घाम न गाळता कमी वेळात श्रीमंत होण्याचा हा राजमार्गच आहे. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंड मैदानावर २८,२९ आणि ३0 तारखेला धान्य महोत्सव आयोजीत केला आहे. या महोत्सवासाठी जिल्ह्यातील ५0 शेतकरी गट पुढे आले आहेत. त्यांनी शेतात पिकविलेल्या शेतमालावर प्रक्रिया केली आहे. हा शेतमाल बाजारात विक्रीस आणला आहे. विशेष म्हणजे हा माल शेतकर्यांचा असल्याने त्यात कुठलीही भेसळ नाही. दज्रेदार आणि चांगल्या प्रतिचा हा शेतमाल आकर्षक पॅकींगमध्ये शेतकरी बचतगटाने तयार ठेवला आहे. बाजारातील शेतमालाचे ठोक दर आणि धान्य महोत्सवातील दर यामध्ये मोठी तफावत आहे. व्यापारी प्रतिष्ठानांच्या तुलनेत शेतकर्यांचा माल चांगल्या प्रतिचा आहे. त्याचे दर कमी आहे. त्यामुळे हे ग्राहकांच्या पैशाची बचत होण्यास हातभार लागणार आहे. व्यापार्यांकडून होणार्या आर्थिक लुटीतून शेतकर्यांची सुटका होण्यास मदत होणार आहे. धान्य महोत्सवात शेतकर्यांनी सेंद्रीय उत्पादनाच्या वस्तू बाजारात आणल्या आहेत. सेंद्री डोलारीचे कमल किशोर धीरण यांनी सेंद्रीय तुरडाळ या धान्य महोत्सवात आणली आहे. शिवाय बेसन आणि गहू विक्रीस आणला आहे. रसायनमुक्त प्रक्रिया धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. यासोबत बापट यांनी सेन्द्रीय भाजीपाला धान्य महोत्सवात आणला आहे. ज्वारी, मुग, उडीद आणि तूर, तिळ महोत्सवात आणला आहे. इसापुरचे अनुराग पाटील यांनी टरबूज उपलब्ध करून दिले आहे. रात चांदना येथील अरविंद बेंडे यांनी काकडी, शिमला मिरची महोत्सवात आणली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रमाई महिला बचतगटाने मुसळी आपल्या शेतात लावली. मुसळी आयुर्वेदिक पावडर येथे आणले आहे. दिग्रस तालुका जैन महिला बचतगटाने लोणचे, चटण्या, आवळे, मुरब्बा टोमॅटो सॉस बाजारात आणला आहे. आलू चिप्स आणि दुग्धजन्य पदार्थसुद्धा इथे उपलब्ध आहे. यासोबत भुईमुगाच्या शेंगा, टमाटर, कांदे, लसन, हळद पावडर, मसाला, तिखट, शेंगदाना चटनी, शेवळ्या कुरोडया, पापड, सरगुंडे या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहे. पहिल्या दिवसांपासूनच ग्राहकांनी या महोत्सवाला भेट देऊन धान्य व इतर वस्तू खरेदीसाठी चांगली गर्दी केल्याचे दिसून आले.
शेतकर्यांचा माल थेट ग्राहकांना
By admin | Updated: May 29, 2014 02:51 IST