शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामचा कारभार ढेपाळला

By admin | Updated: July 18, 2016 00:47 IST

कंत्राटदारांची देयके रखडलीयवतमाळ : जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एकचा कारभार चांगलाच ढेपाळला आहे.

जिल्हा परिषद : कंत्राटदारांची देयके रखडलीयवतमाळ : जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एकचा कारभार चांगलाच ढेपाळला आहे. अनेक कंत्रादारांची देयके रखडल्याने त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत बांधकाम विभाग क्रमांक एक आणि दोन कार्यरत आहे. यापैकी बांधकाम क्रमांक एकचा कारभार चव्हाट्यावर येत आहे. या विभागामार्फत अनेक ठिकाणी रस्ते आणि विविध विकास कामे केली जातात. मात्र कामे पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारांना देयक मिळण्यास प्रचंड विलंब होतो. मोठी देयके काढण्यास तेवढा विलंब होत नाही. मात्र लहान विकास कामांची देयके काढण्यास चांगलाच वेळ लागत असल्याने छोटे कंत्राटदार संकटात सापडले आहेत. विविध विकास कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचे मोजमाप केले जाते. त्यानुसार देयक काढण्याची पुढील प्रक्रिया सुरू होते. मात्र या विभागातून मोजमाप पुस्तिकाच गायब झाल्याचे सांगण्यात येते. तब्बल ५० च्यावर कामांच्या मोजमाप पुस्तिका कार्यालयातून गहाळ झाल्याने देयक काढण्याची प्रक्रियाही खोळंबली. कंत्राटदार मात्र सतत देयकासाठी तगादा लावत होते. त्यामुळे मोजमाप पुस्तिका शोधण्याचे मोठे आव्हान या विभागासमोर होते. त्यापैकी काही मोजमाप पुस्तिका हस्तगत करण्यात आल्याचे वृत्त आहे. तथापि अद्याप किमान ३० च्यावर कामांच्या मोजमाप पुस्तिका गायबच असल्याची माहिती आहे. बांधकाम विभागातून मोजमाप पुस्तिका गायब होऊनही हा विभाग प्रचंड सुस्तच दिसून येत आहे. संबंधित शाखा अभियंता, उपअभियंता आदी अत्यंत उदासीन दिसत आहे. वरिष्ठही अद्याप मूग गिळूनच आहे. दरम्यान मोजमाप पुस्तिका हस्तगत करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यातूनच काही मोजमाप पुस्तिका परत मिळविण्यात या विभागाला यश आल्याची माहिती आहे. मात्र उर्वरित पुस्तिका हाती लागत नसल्याने हा विभागच गोंधळून गेला आहे. नेमके काय करावे, असा प्रश्न विभागाला पडला आहे. यावरून या विभागाची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. (शहर प्रतिनिधी)