शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बांधकाम अभियंत्याने वाचविले अडीच कोटी

By admin | Updated: August 14, 2015 02:35 IST

निविदा, वर्क आॅर्डर, मोजमाप पुस्तिका, देयके याची काटेकोर तपासणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुसद येथील कार्यकारी अभियंत्याने शासनाचे तब्बल अडीच कोटी रुपये वाचविले आहेत.

पुसद विभाग : बांधकाम साहित्य दराची काटेकोर तपासणीयवतमाळ : निविदा, वर्क आॅर्डर, मोजमाप पुस्तिका, देयके याची काटेकोर तपासणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुसद येथील कार्यकारी अभियंत्याने शासनाचे तब्बल अडीच कोटी रुपये वाचविले आहेत. बांधकाम साहित्याचे बाजारात कमी दर असताना प्रत्यक्षात वाढीव दर देऊन हा निधी कंत्राटदारांच्या तिजोरीत जाणार होता. मात्र अभियंत्याची सतर्कता व प्रामाणिकपणामुळे सदर निधी शासनाच्या तिजोरीत वळता करण्यात आला. खुशालराव पाडेवार असे या अभियंत्याचे नाव आहे. सुमारे दोन महिन्यांपासून ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुसद विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते समकक्ष पदावर तीन वर्षे वाशिमला होते. त्यापूर्वी तब्बल सात वर्ष नांदेड महानगरपालिकेत त्यांनी सेवा दिली. गुरूतागद्दी कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी तेथे एकाचवेळी तीन-तीनशे कोटींच्या धनादेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तेथेसुध्दा त्यांनी शासकीय निधीच्या बचतीचे असे अनेक उपक्रम राबविले. तोच फंडा शासनाच्या निधीच्या बचतीसाठी पाडेवार पुसद विभागात वापरत आहेत. पाडेवार यांनी गेल्या दोन महिन्यात शासनाचे अडीच कोटी रुपये वाचविले आहेत. त्यात दोन मोठ्या हॉटमिक्स कंत्राटदारांचे अनुक्रमे ७० लाख व ५० लाख रुपये आहेत. अन्य डझनावर कंत्राटदारांच्या रकमा पाच ते २५ लाखांच्या घरात आहेत. रस्ते, इमारती व पुलांच्या बांधकामातून अडीच कोटींच्या या निधीची एकट्या पुसद विभागात बचत झाली आहे. बांधकामाचा कंत्राट देताना (निविदा-वर्कआॅर्डर) सरसकट बांधकाम साहित्याचे दर लावले जातात. परंतु देयक सादर करताना जो दर असेल तो आकारून देयक मंजूर करणे बंधनकारक आहे. त्यावेळी बांधकाम साहित्याचे बाजारातील दर कमी झाले असतील तर देयक कमी करणे आणि वाढले असेल तर देयकाची रक्कम वाढविणे गरजेचे आहे. हे पाहण्याची जबाबदारी महालेखागार कार्यालयाकडून नियुक्त केलेल्या वर्ग-१ च्या लेखा अधिकाऱ्याने बघणे आवश्यक आहे. त्यांनी या बाबी तपासून ते कार्यकारी अभियंत्याच्या निदर्शनास आणून देणे क्रमप्राप्त ठरते. मात्र प्रत्यक्षात ही खबरदारी घेतली जात नाही. बहुतांश अभियंत्यांचा वाढीव दर कंत्राटदाराला देण्याकडेच अधिक ‘इंटरेस्ट’ असतो. मात्र पुसदचे बांधकाम कार्यकारी अभियंता खुशालराव पाडेवार यांनी या वैयक्तिक ‘इंटरेस्ट’ला फाटा देत शासनाच्या अडीच कोटींच्या निधीची बचत केली. पुसदमध्ये यापूर्वी पाच ते सात वर्षांआधी कृष्णा जनबंधू या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यकाळात असा बचतीचा प्रयोग झाला होता. त्यानंतर मात्र गत दोन महिन्यांपूर्वीपर्यंत वाढीव दराची देयके मंजूर करून शासकीय निधीची मोठ्या प्रमाणात ‘लूटपाट’ करण्यात आली. पुसदच्या कार्यकारी अभियंत्याने गिरविलेला निधीच्या बचतीचा हा कित्ता यवतमाळ, पांढरकवडा तसेच विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता केव्हा गिरविणार ?, पाडेवार यांना जे जमले ते अन्य तीन कार्यकारी अभियंत्यांनासुद्धा का नाही? असा प्रश्न आहे. त्यांनी आपली इच्छाशक्ती जागृत करून स्वत: हे करावे, अथवा यवतमाळचे नवनियुक्त अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के, अमरावतीचे मुख्य अभियंता सी.व्ही. तुंगे यांनी स्वत: दखल घेवून त्यांच्या कडून ही बचत करून घेणे अपेक्षित आहे. (जिल्हा प्रतिनिधी)यवतमाळ, पांढरकवडा, एसपीडी केव्हा वाचविणार निधी ?पुसदचे बांधकाम कार्यकारी अभियंता खुशालराव पाडेवार यांच्या गाडीतच टिकास, पावडे व बांधकामाच्या गुणवत्ता तपासणीसाठी लागणारे अन्य साहित्य कायम पडून असते. ते कोणत्याही कामावर जावून केव्हाही रस्ता खोदून, साईड पट्ट्या खोदून कामाची तपासणी करतात. त्यांचे गुणवत्तेबाबत समाधान झाल्याशिवाय ते देयक मंजूर करीत नसल्याचे सांगितले जाते. उत्पन्न असलेल्या व्यक्तीचा कररु. ३० हजारांवरून २८ हजार रुपये होईल. लोखंड, डांबर, सिमेंट यासारख्या बांधकाम साहित्याचे बाजारभाव तपासून देयक मंजूर करण्याची पद्धत योग्य व कंत्राटदारांच्या हिताची आहे. आज कमी दरामुळे देयक कपात होत असले तरी बाजारात दर वाढल्यास त्याचा फायदाही त्यांना नियमानुसार मिळणार आहे. त्यासाठी विनंती करण्याचीही गरज पडणार नाही. - खुशालराव पाडेवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुसद