शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

२१ उपकेंद्रांचे बांधकाम रखडले

By admin | Updated: December 22, 2016 00:01 IST

निधीअभावी जिल्ह्यातील २१ आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम रखडले आहे. याशिवाय २६ डॉक्टरांची कमतरता आहे.

यवतमाळ : निधीअभावी जिल्ह्यातील २१ आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम रखडले आहे. याशिवाय २६ डॉक्टरांची कमतरता आहे. यामुळे जिल्ह्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडत आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत बुधवारी आरोग्य सेवेचा आढावा घेण्यात आला. त्यात जिल्ह्यातील २१ उपकेंद्रांचे बांधकाम रखडल्याचे समोर आले. यासाठी शासनाकडे २० कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. मात्र अद्याप शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला नाही. यापूर्वी काही उपकेंद्रांच्या बांधकामासाठी १० कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी केवळ दोन कोटी रूपयांचाच निधी देण्यात आला होता. त्यामुळे आता शासनाकडून निधी प्राप्त होतपर्यंत या बांधकामांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यताच प्रदान करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला.जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये तब्बल २६ डॉक्टरांचा तुटवडा आहे. ही पदे भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर आता कुठे पदे भरण्यासाठी मुलाखती घेण्याचा निर्णय झाला. यापूर्वी मुलाखती पार पडल्यानंतर आदेश देऊनही केवळ दोनच डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात रूजू झाले होते. त्यामुळे यावेळीही मुलाखतीनंतर किती डॉक्टर प्रत्यक्षात रूजू होतील, हा प्रश्न कायम आहे. आरोग्य समितीच्या सभेत सभापती नरेंद्र ठाकरे व सदस्यांनी मुलींच्या लिंग प्रमाणात वाढ करण्याबाबतही खल केला. सध्या जिल्ह्यात एक हजार पुरूषांमागे केवळ ९४६ महिला आहेत. यात वाढ करण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे निर्देश सभापती नरेंद्र ठाकरे यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)दहेगावचे केंद्र हलविण्यात अडथळाराळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे प्राथमिक आरोग्य आहे. त्यामुळे तेथील आरोग्य उपकेंद्र आष्टोणा येथे हलविण्याचे निर्देश सभापती नरेंद्र ठाकरे यांनी दिले. मात्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शासकीय निकषानुसार ते उपकेंद्र हलविता येणार नसल्याचे सांगितले. यावर सभापतींनी त्रागा करीत यापूर्वी काहीच निकष नव्हते का, अशी विचारणा करून आपला संताप व्यक्त केला.