डी.एन. चामले : हिवरा येथे मार्गदर्शन शिबिरहिवरासंगम : भारतीय संविधान हे आई एवढेच श्रेष्ठ असून संविधानावर आईपेक्षाही जास्त प्रेम करा, असे प्रतिपादन महागावचे दिवाणी न्यायाधीश डी.एन. चामले यांनी येथे केले.महागाव तालुक्यातील हिवरा येथे विधी सेवा समिती आणि महागाव वकील संघाच्यावतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. न्या. चामले म्हणाले, बळीराजा हा सर्वांचा पोशिंदा आहे. त्याने आत्महत्येचा मार्ग अवलंबने हे त्याच्या कुटुंबासाठी आणि समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर शेतकरी आत्महत्या विषयावर अॅड. आर.व्ही. जाधव, महिलांच्या कायद्यांवर अॅड. एस.आर. राऊत, शिक्षणाचा मूलभूत अधिकार विषयावर अॅड. सुनील साबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वकील संघाचे अध्यक्ष अॅड. के.बी. महागावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील, अॅड. जी.एस. कांबळे, अॅड.एस.आर. राऊत, अॅड. सुनील नरवाडे, अॅड. एन.टी. वानखडे, अॅड.एस.बी. नरवाडे, अॅड. डी.टी. पारेकर, अॅड. आर.बी. जाधव, अनिल खडसे, अमोल दमकोंडावार, पोलीस उपनिरीक्षक राजू राऊत, जमादार रमेश पवार, डॉ. धोंडीराव बोरुळकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
भारतीय संविधान आईएवढेच श्रेष्ठ
By admin | Updated: August 29, 2015 02:45 IST