शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

काँग्रेसची लक्तरे वेशीवर

By admin | Updated: December 11, 2014 23:15 IST

तब्बल ४६ वर्षानंतर म्हणजे शिंगणकरानंतर उमरखेडसाठी मागासवर्गाला उमेदवारी मिळाली. मागासवर्गाला उमेदवारी मिळताच ज्यांनी निरंकुश सत्ता भोगली त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

राजाभाऊ बेदरकर - उमरखेडतब्बल ४६ वर्षानंतर म्हणजे शिंगणकरानंतर उमरखेडसाठी मागासवर्गाला उमेदवारी मिळाली. मागासवर्गाला उमेदवारी मिळताच ज्यांनी निरंकुश सत्ता भोगली त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यातून दोन माजी आमदारांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे उमरखेड काँग्रेसची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मागास आरक्षणातून निवडून आलेले माजी आमदार विजय खडसे यांना पहिलीच निवडणूक सत्त्व परीक्षा ठरली. काँग्रेसमधीलच काही दिग्गजांनी खडसेंची उमेदवारी जाहीर होताच नाक मुरडणे सुरू केले. परंतु त्यावेळी लोकांना बदल हवा होता. त्यामुळे खडसे विजयी झाले. हा विजय खडसे नको म्हणणाऱ्यांनी नाईलाजास्तव साजरा केला. नंतरच्या पाच वर्षात सगळे जण खडसेंच्या सत्तेच्या गाडीत बसले. वास्तविक खडसेंनीच या सगळ्यांना सोबत घेऊन काँग्रेसची आब राखत काँग्रेसच्या मतदारसंघातील विकासाचा गाडा पुढे रेटत नेला. पाच वर्षांपर्यंत सोबत राहणाऱ्यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असता काँग्रेसचे निष्ठावान म्हणविणाऱ्यांनी मला विधानसभेच्या निवडणुकीत एकाकी का पाडावे, हाच खडसेंचा खरा राग होता. माजी आमदार अ‍ॅड.देवसरकर आणि खडसेंमध्ये पराभवाच्या निमित्ताने चांगलेच वादंग निर्माण झाले. कोण कसे बोलले, कुठे बोलले, काय बोलले हा वेगळा चर्चेचा व रोषाचा विषय असला तरी या निमित्ताने उमरखेड काँग्रेसची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली, एवढे मात्र खरे. खडसेंनीही अनेक दिवस केवळ मनात ठेवलेला रोष एकदाचा बोलून दाखविला. आता मात्र दोघेही माजी आमदार झाले आहेत. परंतु जनतेत मात्र काँग्रेसच्या दृष्टीने आवश्यक तो संदेश गेला नाही. संपूर्ण राज्यात काँग्रेसची गळती असताना लोकसभेतील काँग्रेसच्या विजयामुळे लोकांना थोडीफार आशा होती. तीसुद्धा अंतर्गत राजकारणामुळे धूसर झाली. व्यक्तिगत बाबींमुळे पक्षाची किती हानी होते हे या प्रकरणावरून सगळ्यांनाच जाणवले. पक्षापेक्षा कोणतीच व्यक्ती मोठी नसते याचा विचार दोन्ही आमदारांना पडलेला दिसतो. पक्षाच्या बळावरच अ‍ॅड.देवसरकर दोनदा या भागाचे आमदार झाले आणि खडसेही मोठे झाले. तालुका काँग्रेसमधील हे भांडण ज्यांचा काँग्रेसच्या कार्यशैलीवर विश्वास आहे त्यांचा हिरमोड करण्यास कारणीभूत ठरले. उमरखेड विधानसभा क्षेत्र मागासवर्गीय उमेदवाराला शाप ठरतो की काय, असे वाटायला लागले. ज्यांची खडसेंवर विशेषत: निष्ठा होती ते मागासवर्गीयसुद्धा आता बोलू लागले आहेत. त्यांच्या मनात कुठे तरी कळ उठत असून आंबेडकरी विचारसरणीला छेद देणारा गट तर मतदारसंघात सक्रिय होत नाही ना, या शंकेने त्यांना ग्रासले आहे. दोघा माजी आमदारांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, अशी सर्वसामान्यांची त्यांच्याकडून माफक अपेक्षा असल्याचे दिसून येते.