शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवड्यात काँग्रेस दोन जागांवर विजयी

By admin | Updated: February 24, 2017 02:38 IST

पांढरकवडा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या आठही गणाचे निकाल धक्कादायक लागले असून

पंचायत समिती शिवसेनेकडे : जिल्हा परिषदेत सेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागानरेश मानकर   पांढरकवडापांढरकवडा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या आठही गणाचे निकाल धक्कादायक लागले असून जिल्हा परिषद गटाच्या दोन जागा काँग्रेसला, एक शिवसेनेला तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली.पंचायत समितीच्या आठ जागांपैकी पाच जागा प्राप्त करुन शिवसेनेने बहुमत प्राप्त केले. उर्वरित एक जागा काँग्रेसने,एक जागा भाजपने तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने प्राप्त केली.पहापळ जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या सुरचिता पाटील निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेच्या कविता राठोड यांचा पराभव केला. पाटील यांना ६,५११ तर राठोड यांना ४,९८६ मते मिळालीत. खैरगाव जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या वैशाली राठोड निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या मनिषा वासेकर यांचा पराभव केला. राठोड यांना ६७२३ तर वासेकर यांना ५,८१० मते मिळाली. मोहदा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे निमिश मानकर निवडून आले.त्यांनी काँग्रेसचे प्रकाश मानकर यांचा पराभव केला निमेश मानकर यांना ५१७२ तर प्रकाश मानकर यांना ३,३०९ मते मिळाली. पाटणबोरी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे गजानन बेजंकीवार निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे श्रीनिवास नालमवार यांचा पराभव केला. बेजंकीवार यांना ६,३२७ मते मिळाली तर नालमवार यांना ५,५८६ मते मिळाली.पहापळ पचायत समिती गणातून शिवसेनेच्या अनुराधा वेट्टी निवडून आल्या.त्यांनी काँग्रेसच्या संजीवनी सुरपाम यांचा पराभव केला. वेट्टी यांना २,७३५ तर सुरपाम यांना २,६६४ मते मिळाली. आकोली बु.गणात शिवसेनेचे संतोष बोडेवार यांचा निसटता विजय झाला. त्यांनी भाजपच्या किशोर देशट्टीवार यांचा केवळ पाच मतांनी पराभव केला. बोडेवार यांना २,८२२ मते तर देशट्टीवार यांना २,८१७ मते मिळाली. खैरगाव बु.गणात काँग्रेसच्या उज्वला बोंडे निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या विद्या राठोड यांचा पराभव केला. बोंडे यांना ३,६८५ मते तर राठोड यांना २,७७७ मते मिळाली. सायखेडा गणात भाजपच्या शिला गेडाम निवडून आल्या. त्यांनी काँग्रेसच्या नलू धुर्वे यांचा पराभव केला. गेडाम यांना ३,२६७ तर धुर्वे यांना २,८४६ मते मिळाली. मोहदा गणात शिवसेनेचे पंकज तोडसाम निवडून आले. त्यांनी राकॉंचे गजानन मडावी यांचा पराभव केला. तोडसाम यांना १,९३६ तर मडावी यांना १८१० मते मिळाली. करंजी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र नंदुरकर निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे संजय कुंडलवार यांचा पराभव केला.नंदुरकर यांना ३००४ मते तर कुंडलवार यांना २५८९ मते मिळाली. बोथ गणात शिवसेनेच्या इंदू मिसेवार निवडून आल्या.त्यांनी काँग्रेसच्या सुवर्णा परचाके यांचा पराभव केला. मिसेवार यांना २६८७ तर काँग्रेसच्या परचाके २५९० मते मिळाली. पाटणबोरी गणात शिवसेनेचे राजेश पसलावार निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे स्वामी कोरेड्डीवार यांचा पराभव केला. पसलावार यांना २८०३ मते तर कोरेड्डीवार यांना २६०८ मते मिळाली. पांढरकवडा शहरातील जिड्डेवार सांस्कृतिक भवनात सकाळी १० वाजतापासून चोख पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला प्रारंभ झाला.