शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

काँग्रेसच्या कर्जमुक्ती पदयात्रेने लक्ष वेधले

By admin | Updated: June 28, 2015 00:05 IST

कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अकोलाबाजार येथे आयोजित शेतकरी कर्जमुक्ती पदयात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.

नेत्यांची मांदियाळी : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुली दत्तक अकोलाबाजार : कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अकोलाबाजार येथे आयोजित शेतकरी कर्जमुक्ती पदयात्रेने सर्वांचे लक्ष वेधले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात देऊन त्यांच्या दोन मुलींना दत्तक घेतले. राज्यस्तरीय आंदोलनाचे रणशिंग अकोलाबाजार येथून फुंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाले. यवतमाळ तालुक्यातील पिंपरी बुटी येथून शनिवारी काँग्रेसने शेतकरी कर्जमुक्ती या राज्यस्तरीय आंदोलनाचा शुभारंभ केला. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी केले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. नितीन राऊत, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. या आंदोलनात विदर्भातील काँग्रेसचे बहुतांश आजी-माजी आमदार सहभागी झाले होते. पिंपरी येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करून मदत देण्यात आली. त्यातील रुपेश रामचंद्र काळे या शेतकऱ्याच्या दोन मुलींना आमदार यशोमती ठाकूर व संध्याताई सव्वालाखे यांनी दत्तक घेत शिक्षणासह संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पाच किलोमीटर शेतकरी कर्जमुक्ती पदयात्रा काढून अकोलाबाजार येथे त्याचे जाहीर सभेत त्याचे रुपांतरण झाले. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजपा-सेना युती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. अशोक चव्हाण म्हणाले, युती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूकच केली असून शेतमालाचे भाव घसरले आहे. शेतकऱ्यांना कोणतीच मदत झाली नाही. संपूर्ण कर्जमाफीसाठी भाग पाडणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. अन्य नेत्यांनीही विचार मांडले. आमदार यशोमती ठाकूर यांनी भाजपाविरोधी नारे दिले. (वार्ताहर)माजी प्रदेशाध्यक्षांसह आमदारांचे मोबाईल लंपास काँग्रेसच्या कर्जमुक्ती आंदोलनाला चोरट्यांचा फटका बसला. माजी प्रदेशाध्यक्षासह चार आमदारांचे महागडे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. तर अकोलाबाजार येथे पदयात्रेच्या चहा-पानाची व्यवस्था करणाऱ्या कार्यकर्त्याचे रोख दहा हजारही चोरट्यांनी लांबविले. या हातसफाईची चर्चा आंदोलनादरम्यान रंगली होती. नेहमी आलिशान वाहनातून फिरणाऱ्या नेत्यांची पदयात्रेत चांगलीच दमछाक झाल्याचे दिसत होते. याच संधीचा फायदा घेऊन नेहमी रस्त्यावर असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांच्या आलिशान वाहनातून पिंपरी बुटी ते अकोलाबाजारपर्यंत सफर करून काही क्षणाचा का होईना आनंद लुटला.