शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला ‘नो-रिस्पॉन्स’

By admin | Updated: May 17, 2015 00:20 IST

काँग्रेस पक्षाने आपली सदस्य नोंदणी जिल्हाभर सुरू केली असली तरी त्याला जनतेतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने तब्बल....

सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ : कुणालाच इन्टरेस्ट नाही, सर्वच कोमात, नेत्यांच्या गटबाजीचा फटका राजेश निस्ताने यवतमाळ काँग्रेस पक्षाने आपली सदस्य नोंदणी जिल्हाभर सुरू केली असली तरी त्याला जनतेतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने तब्बल तिसऱ्यांदा या नोंदणीला मुदतवाढ दिली गेली आहे. यावरून काँग्रेस पक्षात किती मरगळ आली हे दिसून येते. गेली १५ वर्ष केंद्र व राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत ही दोनही सरकारे जनतेने उद्ध्वस्त केली. यवतमाळसह महाराष्ट्रात काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर आता तब्बल सहा महिन्याने काँग्रेसने पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी खुद्द राहुल गांधी ठिकठिकाणी दौरा करीत आहे. काँग्रेसने पुन्हा सदस्य नोंदणी सुरु केली आहे. मात्र या नोंदणीला जिल्ह्यातील जनतेतून प्रतिसादच नाही. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सदस्य नोंदणी व्हावी म्हणून जोमाने प्रयत्न करताना दिसत नाहीत. जेथे कुठे निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहे तेथे जनतेचा या नोंदणीला कोणताच प्रतिसाद नाही. काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी सदस्य नोंदणीसाठी नेलेल्या पावती पुस्तकांचा अद्याप जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात परतावा झालेला नाही. अनेकांच्या तर पावत्याही फाटल्या नसल्याची माहिती आहे. या सदस्य नोंदणीसाठी सुरुवातीला २८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ देत १५ मे ही तारीख ठरविली गेली. मात्र ही तारीख जाऊनही सदस्य नोंदणीचे अपेक्षित उद्दीष्ट पूर्ण होत नसल्याचे पाहून आता तिसऱ्यांदा या नोंदणीला महिनाभराची मुदतवाढ दिली गेली आहे. १५ जून ही सदस्य नोंदणीची अंतिम तारीख राहणार असल्याचे पत्र काँग्रेसचे प्रवक्ते तथा अखिल भारतीय महासचिव जनार्दन द्विवेदी यांच्याकडून जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाला प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांवर पर्यायाने पक्षावर मरगळ आल्याने सध्यातरी कुणीही काँग्रेसमध्ये येण्यास, सदस्य होण्यास तयार नसल्याचे विदारक चित्र जिल्हाभर पहायला मिळत आहे. काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला प्रतिसाद न मिळण्यामागे नेत्यांमधील गटबाजी हेसुद्धा एक प्रमुख कारण पुढे आले आहे. नेत्यांमध्ये एकजुट नाही, प्रत्येक जण एकमेकांचे पाय ओढण्यात मग्न आहे. त्यामुळे कार्यकर्तेही विखुरलेले आहेत. त्याचा परिणाम काँग्रेसच्या सदस्य नोंदणीवर होताना दिसतो आहे. केवळ बंदद्वार भाषणे, आक्रमक आंदोलनांचा पत्ताच नाहीकेंद्रात व राज्यात भाजपा आघाडीचे सरकार असल्याने काँग्रेसवर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका वठविण्याची मोठी जबाबदारी आली आहे. मात्र काँग्रेसचे नेते अद्यापही पक्ष कार्यालयात बसून आपल्याच परंपरागत कार्यकर्त्यांपुढे केवळ भाषणे ठोकण्यात आणि त्यांनाच पक्षाची महती सांगण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. दिल्ली-मुंबईतील क्षुल्लक बाबींवर पक्षाच्या स्थानिक बैठकीत अभिनंदनाचे ठराव घेणे यापुढे हे नेते सरकण्यास तयार नाहीत. प्रत्यक्षात काँग्रेसकडून जनतेला आक्रमक आंदोलनांची अपेक्षा आहे. मात्र काँग्रेसने सत्ता गेल्यानंतर एकही लक्षवेधी आंदोलन केलेले नाही. आतापर्यंत त्यांनी केलेली आंदोलने ही पोस्टर-बॅनर आणि फोटो पुरतीच मर्यादित राहिली आहेत. सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने एकही मोठे आंदोलन जिल्ह्यात उभारलेले नाही. त्यातच संसदेत भाषण करताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोएडा, पुणे, मुंबई या सारख्या मेट्रो सीटीला लागून असलेल्या शेतीबाबत पुळका दाखविल्याने आधीच सामान्य शेतकरी नाराज आहेत. त्यामुळेच सामान्य शेतकऱ्यांचा काँग्रेसच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. मुळात काँग्रेसकडे आक्रमक आंदोलनांचा दीर्घ अनुभव असलेला नेताच नाही. किमान नव्या जिल्हाध्यक्षपदी तरी अशी पार्श्वभूमी असलेल्या नेत्याचा शोध घेतला जावा, ही रास्त अपेक्षा पक्षाचे निष्ठावंत सामान्य कार्यकर्ते ठेऊन आहेत. मात्र नेते मंडळी अद्यापही त्या मानसिकतेत नाही. मंत्री-आमदार राहिलेल्या नेत्यांच्याच गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडावी म्हणून प्रयत्न सुरू आहे. सामान्य कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद देण्याची अद्यापही या नेत्यांची मानसिकता दिसत नाही. सध्या जिल्ह्यात शिवसेनाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरत असल्याचे त्यांच्या ‘प्रशासकीय बॅटींग’वरून दिसून येते.