शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

दारव्हा येथे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

By admin | Updated: October 30, 2016 00:14 IST

नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज भरण्यात आले.

नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी ११ तर सदस्यांसाठी १३९ नामांकनदारव्हा : नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज भरण्यात आले. नगराध्यक्षपदाच्या एकूण उमेदवारांची संख्या ११ तर सदस्यपदाच्या उमेदवारांची संख्या १३९ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, शनिवारी अनेक नाट्यमय घडामोडीनंतर या निवडणुकीकरिता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली. तर शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहे. त्याचप्रमाणे इतर पक्ष व अपक्षांची संख्या अधिक असल्याने बहुरंगी लढतीची चिन्हं आहे. काँग्रसचे सिद्धार्थ गडपायले व शिवसेनेचे बबनराव इरवे यांनी नगराध्यक्षपदासाठी यापूर्वीच उमेदवारी अर्ज भरले. पक्षाने यावर शनिवारी शिक्कामोर्तब केले. भाजपाच्यावतीने सचिन जाधव यांनी नामांकन अर्ज दाखल केला. सदस्यपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी या प्रमुख पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्याचबरोबर काही अपक्ष असे एकूण १३९ नामांकन सादर झाले. नामांकन दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समेट घडून आला. कॉग्रेसकडे नगराध्यक्षपद व १५ सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे सदस्यपदाच्या पाच जागा आल्या. काँग्रेसचे राहुल ठाकरे, सैयद फारूक, अशोक चिरडे तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वसंत घुईखेडकर, उत्तमराव शेळके, अमोल राठोड यांच्यात चर्चा होवून आघाडीचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेने नगराध्यक्षांसह १६ अधिकृत व दोन पुरस्कृत उमेदवार मैदानात उतरविले. याबाबतची माहिती पक्ष निरीक्षक बाबू पाटील जैन यांनी दिली. भाजपानेही नगराध्यक्ष आणि सदस्य पदाच्या १५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष दत्तात्रय राहाणे यांनी सांगितले. दाखल झालेल्या अर्जातील मोठ्या प्रमाणात नामांकन कायम राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होईल, अशी चर्चा रंगत आहे. (तालुका प्रतिनिधी)