लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तुमच्या घरचा कर्ता पुरुष गेला. तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण आलेल्या या परिस्थितीपुढे हिम्मत हारून रडून फायदा नाही. या परिस्थितीशी दोन हात करा. आम्हाला आमच्या स्तरावरून जे काही करता येईल, ते आम्ही करू, असे धीर देणारे सांत्वन आमदार विजय वडेट्टीवार, आमदार यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या आमदार समितीने सोनुले व मानगावकर यांच्या कुटुंबाची भेटी घेवून केले.शनिवारी विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप व अमित झनक या काँग्रेस आमदार समितीने मानोली व टिटवी येथे भेट दिली. मानोली येथे शेतात फवारणी करताना शेतमजूर बंडू सोनुले याचा विषबाधा होवून मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाची या समितीने भेट घेतली. शेतकºयांना अशा प्रकारे मृत्यूनंतर मिळणारी दोन लाखांची मदत तुटपुंजी आहे. ती वाढवून दहा लाख रुपये मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. यावेळी उपस्थित असलेले भाजपचे आमदार यांनीसुद्धा तसा प्रयत्न करावा, असेही ते आमदार तोडसाम यांना म्हणाले. काही योजना शेतकºयांसाठी आहे. त्यासुद्धा शेतमजुरांसाठी लागू करण्याकरिता प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.टिटवी येथे प्रकाश मानगावकर यांनी कर्जापायी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाचे सात्वंन करताना आमदार वडेट्टीवार व यशोमती ठाकूर म्हणाल्या, किशोर तिवारी यांनी दिलेल्या नोकरीचे आश्वासनाचा पाठपुरावा आम्ही करू, असे सांगितले. शासन कर्जमाफी आॅनलाईन, शेतमाल आॅनलाईनने आणखी किती लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडणार आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय कडू, किशोर दावडा, सुभाष गोडे आदी उपस्थित होते.
काँग्रेस आमदार समिती मानोली व टिटवीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:16 IST
तुमच्या घरचा कर्ता पुरुष गेला. तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण आलेल्या या परिस्थितीपुढे हिम्मत हारून रडून फायदा नाही.
काँग्रेस आमदार समिती मानोली व टिटवीत
ठळक मुद्देतुमच्या घरचा कर्ता पुरुष गेला. तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.