शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते विधानसभा क्षेत्रात

By admin | Updated: February 5, 2017 00:50 IST

जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यावरून काँग्रेस नेत्यांमधील भांडणे मुंबईपर्यंत गाजली असली तरी सध्या ती बाजूला सारण्यात आली आहे.

जिल्हा परिषद निवडणूक : गटबाजी बाजूला, प्रतिष्ठा पणाला यवतमाळ : जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यावरून काँग्रेस नेत्यांमधील भांडणे मुंबईपर्यंत गाजली असली तरी सध्या ती बाजूला सारण्यात आली आहे. या नेत्यांवर आपल्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. प्रतिष्ठा राखण्यासाठी हे नेते कामाला लागले आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी व भांडणे सर्वश्रृत आहेत. जिल्हाध्यक्ष पदाचा वाद गाजला. त्यावर पडदा पडते तोच जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवरून बरेच वादंग झाले. दप्तर आदळण्यापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या या गटबाजीपुढे आपला संताप व्यक्त केला. मात्र तिकीटांचे वाटप झाल्यानंतर अचानक ही गटबाजी थंडावल्याचे चित्र आहे. जणू आमच्यात गटबाजी नव्हतीच, असे भासविण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहे. पक्षाने विधानसभेच्या पराभूत उमेदवारांना अर्थात काँग्रेसच्या या दिग्गज नेत्यांना आपआपल्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे गटबाजी बाजूला सारुन हे सर्व नेते आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक जागा मिळविणे व पंचायत समित्याही ताब्यात घेऊन आपले वर्चस्व सिद्ध करणे हे ध्येय या नेत्यांनी ठेवले आहे. पालकमंत्री पदाच्या फेरबदलावरून शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये ठिणगी पडली आहे. त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसतो आहे. काँग्रेस सर्वदूर पोहोचली आहे. हवेची झुळूक आली तरी पक्षाचा फायदा होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत गतवेळी पेक्षा काँग्रेसच्या जागा वाढतील, असा दावा नेत्यांकडून केला जात आहे. त्यासाठी नोटाबंदी हे प्रमुख कारण सांगितले जाते. नोटाबंदीने ग्रामीण जनतेला छळले आहे. नुकत्याच झालेल्या केंद्राच्या बजेटने जनतेच्या अपेक्षा फोल ठरविल्या आहेत. कर्जमुक्ती, शेतमालाला वाढीव भाव, जनधनच्या खात्यात ठेव या भाजपाच्या घोषणा पोकळ ठरल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसच्या काळात लाल्या, खरडी, गारपीट या सारखे अनुदान सातत्याने मिळत होते. मात्र भाजपा सरकारमध्ये त्याचा अभाव आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी घरकुल योजनेची घोषणा केली गेली. मात्र प्रत्यक्षात या योजनेचे कामही सुरू झाले नाही. या उलट काँग्रेसने ऐतिहासिक निर्णय घेऊन तीन लाख घरकूल बांधल्याचे काँग्रेस नेत्यांकडून सांगितले जाते. भाजपा सरकारच्या नेत्यांची बयाणे व त्यांची एकूणच पावले आरक्षण उठविण्याकडे असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व मुद्यांवर प्रकाशझोत टाकून काँग्रेस नेते जिल्हा परिषदा बळकाविण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस हाच सक्षम पर्याय असल्याचा दावा या नेत्यांकडून केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)