शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

काँग्रेसचे नेते गब्बर, कार्यकर्ते फाटकेच

By admin | Updated: June 14, 2014 23:58 IST

जिल्ह्यातील काँग्रेसचे पाचही आमदार पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. परंतु त्यांच्या विरोधात मतदारांसह पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही रोष आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या

जिल्हा काँग्रेसची रविवारी बैठक : लोकसभेतील पराभवावर होणार चिंतनयवतमाळ : जिल्ह्यातील काँग्रेसचे पाचही आमदार पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. परंतु त्यांच्या विरोधात मतदारांसह पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही रोष आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीने कार्यकर्ते नाराज आहे. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला दारावर ठेवून कमिशन पॅटर्नसाठी दलाल, कंत्राटदारांना अ‍ॅन्टी चेंबरमध्ये स्थान देण्याच्या प्रवृत्तीला सामान्य कार्यकर्त्यांचा विरोध आहे. नेत्यांचा हा कमिशन पॅटर्नच त्यांना आगामी निवडणुकीत बुडविणार, अशी चिन्हे दिसू लागली आहे. गेल्या पाच वर्षात नेते आणखी गब्बर झाले आणि पक्षाचा कार्यकर्ता मात्र फाटकाच राहिला. कंत्राटदार अ‍ॅन्टी चेंबरमध्ये आणि कार्यकर्ता फाटकाबाहेर उन्हात उभा, असे विसंगत चित्र काँग्रेस नेत्यांच्या घरी पहायला मिळत आहे. जनतेला मूलभूत सुविधाही नाहीज्यांच्या मतावर नेते मंडळी मोठी झाली त्या सामान्य जनतेची अवस्थाही काँग्रेस कार्यकर्त्यांपेक्षा वेगळी नाही. ग्रामीण व शहरी जनतेला आजही तासन्तासाच्या वीज भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्षात मात्र गावे, तांडे, वाड्या, मागासवस्त्या भारनियमनाचा सामना करीत आहे. पाच वर्षात रस्ते, नाल्यांची मूलभूत सुविधाही निकाली निघू शकली नाही. पिण्याच्या पाण्याची तर भीषण अवस्था आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या पाणीटंचाईची डागडुजी केली जाते. मात्र कायम स्वरुपी तोडगा काढण्याची कुणाचीच मानसिकता नाही. लोकप्रतिनिधींची सामान्य जनतेप्रती असलेली ही उदासीनता पाहून प्रशासनही मग केवळ खानापूर्ती करून अंमलबजावणीचा आव आणताना दिसते. पैशाशिवाय काम होत नाहीशासकीय कार्यालयात जनतेची कामे होत नाही, क्षुल्लक दाखल्यांसाठी एक तर येरझारा माराव्या लागतात किंवा तत्काळ काम व्हावे असे वाटत असल्यास लाच द्यावी लागते. कारण दाखले देणारी ही यंत्रणा नेत्यांकडे ‘रॉयल्टी’ भरुन आपल्या सोईने त्या जागेवर नियुक्त झाली आहे. त्यामुळे नेतेही आपले काही बिघडवू शकत नाही, याची खात्री त्या शासकीय यंत्रणेला आहे. त्यामुळेच ते जनतेला, पक्ष कार्यकर्त्यांना आणि वेळप्रसंगी त्या नेत्यांनाही जुमानत नसल्याचे, मुजोर झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बीपीएलमध्ये निकृष्ट धान्यगोरगरिबांना बीपीएलच्या नावाखाली निकृष्ट धान्याचा पुरवठा केला जात आहे. मुळात त्यांच्या नावाने निघणारे धान्य जादा दराने काळ्याबाजारात विकले जात आहे. शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम महिनोमहिने पाठविली जात नाही. अनुदानाचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होत नाही. शासकीय यंत्रणेकडील कामांचा व्याप प्रचंड वाढविला गेला आहे. परंतु तेथे आवश्यक सोईसुविधा, पुरेसे मनुष्यबळ शासनाने उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळेसुद्धा जनतेची कामे तत्काळ मार्गी लागण्यास अडचणी निर्माण होत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ आढावा बैठकांची खानापूर्ती तेवढी केली जात आहे. शासकीय योजना मोठ्या प्रमाणात असल्या तरी त्याचे लाभार्थी श्रीमंत व्यक्तीच ठरत आहेत. गोरगरिबांसाठी बनलेल्या या योजनांचा प्रत्यक्ष त्यांना लाभच मिळत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे पटत नाहीराजकीयदृष्ट्या विचार केल्यास राज्यात आघाडीचे सरकार असले तरी प्रत्यक्षात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून विस्तवही जात नाही. त्यांचे कुठेच आपसात पटत नाही. नेत्यांच्या गटबाजीतून कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठले आहे. कामांचे कंत्राट, कमिशनसाठी मारामाऱ्या होत आहे. दोनही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहत आहे. काँग्रेसचे मायनस पॉर्इंटच अधिकसत्ताधारी पक्षाचे असे अनेक मायनस पॉर्इंट आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला महायुतीचा सक्षम पर्याय उभा झाला आहे. नागरिकांनी या पर्यायाचा उत्स्फूर्तपणे स्वीकार केल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीत पहायला मिळाले. त्यामुळेच यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसच्या दोनही मंत्र्यांचा पराभव झाला. हे सर्व काँग्रेस आमदारांचे अपयश मानले जाते. हेच आमदार आता पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. उपरोक्त सर्वबाबी लक्षात घेता खरोखरच मतदार त्यांना पुन्हा निवडून देईल का, पाच वर्षांपासून फाटकाच राहिलेला काँग्रेस कार्यकर्त्या त्यांच्यासाठी मनापासून काम करेल का हा आत्मचिंतनाचा प्रश्न आहे. म्हणूनच सामान्य मतदार ‘काँग्रेस आमदारांना पुन्हा निवडून द्यावे कसे’ असा जाहीर सवाल विचारत आहे. कुणाकडेच उत्तर नाहीजनतेच्या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी काँग्रेसचे आमदार व प्रदेशाध्यक्षांकडे नाहीत. जिल्हा काँग्रेस कमिटीची रविवार १५ जून रोजी दुपारी १ वाजता बैठक होत आहे. किमान या बैठकीत तरी सामान्य नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या बैठकीत लोकसभेतील पराभवाची कारणे आणि विधानसभेची तयारी यावर चिंतन होणार आहे. (प्रतिनिधी)