शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला होती तीन सभापती पदांची आॅफर

By admin | Updated: April 4, 2017 00:04 IST

११ सदस्यांच्या बळावर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा तीन सभापतीही मिळविण्याची संधी होती.

संधी सोडली : राळेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपा, राष्ट्रवादी स्ट्राँग होण्याची चिन्हे यवतमाळ : ११ सदस्यांच्या बळावर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा तीन सभापतीही मिळविण्याची संधी होती. परंतु अचानक नैतिकतेचा मुद्दा पुढे करून काँग्रेसने ही आॅफर नाकारली. त्यामुळे काँग्रेसच्या तीन सदस्यांची सभापतीची संधी हुकली. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसने चक्क भाजपाशी हातमिळवणी करून अध्यक्षपद मिळविले. काँग्रेस पदासाठी काहीही करू शकते, याची जाणीव झाल्याने शिवसेनेकडून त्यांना सभापतीच्या तीन जागांची आॅफर दिली गेली होती. केवळ बांधकाम समिती शिवसेनेला हवी होती, अशी राजकीय गोटातील माहिती आहे. सेनेच्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठकही पार पडली. मात्र आपण अध्यक्षपद मिळूनही भाजपाची साथ सोडून गेल्यास आपल्याला राजकीय नैतिकता उरणार नाही, अशी सबब पुढे करून काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावला. त्यावर अध्यक्ष पदासाठी भाजपाला साथ देताना पहिल्यांदा काँग्रेसला नैतिकता आठवली नाही का ? असा मुद्दा कार्यकर्ते उपस्थित करीत आहे. हा प्रस्ताव धुडकावण्यामागेही वेगळेच राजकारण असल्याचे सांगितले जाते. सभापती निवडणुकीत शिवसेनेला साथ दिल्यास सहा महिन्यानंतर अध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव आणला जाण्याची हूरहूर काँग्रेसला होती. राष्ट्रवादीच्या गोटातून तशी तंबीही दिली गेल्याची चर्चाही राजकीय गोटात आहे. वास्तविक अविश्वास पारित होण्यासाठी किमान ४२ सदस्य संख्या गरजेची आहे. भाजपा-सेना एकत्र आली तरी हा आकडा गाठणे शक्य नव्हते. भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येऊनही फायदा होणार नव्हता. असे असताना काँग्रेसला अविश्वासाची भीती वाटणे न समजण्यासारखे आहे. काँग्रेसने आॅफर स्वीकारली असती तर उमरखेड, आर्णी, मारेगाव या तालुक्यात सभापतीपदे गेली असती. आर्णीत स्वाती येंडे यांची वर्णी लावावी लागली असती. तसे झाले असते तर ही सदस्या अभ्यासू असल्याने अध्यक्षांवर भारी पडण्याची हूरहूर होती. या माध्यमातून विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांचे अप्रत्यक्ष वजन वाढले असते. एक सभापतीपद उमरखेडला गेल्यास माजी आमदार विजय खडसेही चर्चेत आले असते. तब्बल तीन सभापती एकट्या राळेगाव मतदारसंघात आल्याने काँग्रेसला अर्थात पुरकेंना भविष्यात राजकीय नुकसानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण हे तीनही सभापती (राष्ट्रवादी, भाजपा, अपक्ष) भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पणाच्या आडोश्याने झपाट्याने या मतदारसंघात आपल्या पक्षाची बांधणी मजबूत करू शकतात. तसे झाल्यास पुरकेंना २०१९ ची विधानसभा आणखी कठीण जाण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हाध्यक्ष पदाच्या पुरकेंच्या आशा कायम ११ सदस्यांच्या बळावर अध्यक्षपद आणि तीन सभापती अर्थात जिल्हा परिषदेच्या सहा पैकी चार महत्वपूर्ण खुर्च्या काँग्रेसच्या ताब्यात राहिल्या असत्या. मात्र काँग्रेसने ही संधी सोडली. माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी सर्वाधिक आग्रही होते. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा तिढा अद्याप न सुटल्याने आशावादी असलेल्या माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनीही मोघेंचीच री ओढली. आजच्या घडीला आर्णी विधानससभा मतदारसंघात लालदिवा आल्याने मोघे फायद्यात आहेत. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सूत्रे मोघेंकडेचकाँग्रेसच्या ११ पैकी सर्वाधिक पाच जागा आर्णी विधानसभा मतदारसंघातील असल्याने जिल्हा परिषदेच्या आधी अध्यक्ष-उपाध्यक्ष व आता सभापती निवडणुकीत अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्याच हाती काँग्रेसची संपूर्ण सूत्रे असल्याचे चित्र पहायला मिळाले. काँग्रेसला दुसऱ्यांदाही लॉटरी लागणार होती. अन्य विधानसभा मतदारसंघांनाही प्रतिनिधीत्व मिळणार होते. मात्र मोघे-पुरकेंच्या नकाराने संधी हुकली. त्याबाबतची खंत काँग्रेसचे काही सदस्य व कार्यकर्तेसुद्धा व्यक्त करताना दिसत होते.