शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दारव्हा येथे काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: December 22, 2016 00:14 IST

शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

दारव्हा : शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून निघालेला मोर्चा तहसीलवर पोहोचल्यानंतर याठिकाणी सभा घेण्यात आली. मोर्चात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, पक्षाचे निरीक्षक श्याम उमाळकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, देवानंद पवार, मनमोहनसिंह चव्हाण, पंढरीनाथ सिंहे, माजी नगराध्यक्ष सैयद फारूक, अशोक चिरडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, महिला काँग्रेसच्या विजया सांगळे यांचा प्रामुख्याने सहभाग होता. आजच्या घडीला जनसामान्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या समस्या सोडवायच्या सोडून सरकार नाही ते प्रश्न उपस्थित करून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केला. प्रसंगी संजय देशमुख, श्याम उमाळकर, देवानंद पवार, विजया सांगळे, ज्ञानेश्वर बोरकर, पंढरीनाथ सिंहे आदींची भाषणे झाली. नोटबंदी, मायक्रो फायनान्स, शासनाचे शेतकरी विरोधी धोरण, जनधन योजना यासह विविध विषयांचा आपल्या भाषणात उल्लेख करून केंद्र व राज्य शासनावर टीकेची झोड उठविली. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, उद्योजकांच्या धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, संपूर्ण कार्डधारकांना रेशनचा पुरवठा व्हावा, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, गरजूंना घरकुले द्यावी, महिला बचत गट आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ व्हावे, श्रावणबाळ योजनेचे अनुदान वाढवून मिळावे आदी मागण्यांचा समावेश या निवेदनात केला आहे. (तालुका प्रतिनिधी)