शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेविरूद्ध काँग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:19 IST

नगरपरिषदेत समाविष्ट क्षेत्रातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी बुधवारी पालिकेसमोर उपोषण केले.

ठळक मुद्देयवतमाळ शहरात अस्वच्छता : रस्ते, शौचालयांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

ऑनलाईन लोकमत यवतमाळ : नगरपरिषदेत समाविष्ट क्षेत्रातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी बुधवारी पालिकेसमोर उपोषण केले. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी महिनाभरात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.लोहारा परिसरातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये विकास कामे होत नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या प्रभागातील नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधले. मात्र त्यांना अद्याप अनुदानाचे धनादेश मिळाले नाही. याच प्रभागातील दारव्हा रोडवरील रस्ता जीवन प्राधिकरणाच्या नालीमुळे धोक्यात आला. या संदर्भात वारंवार सूचना देऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रभागातील खड्डामय रस्त्याची डागडुजी केली जात नाही. प्रभागातील स्वच्छतेकरिता शिपाई मिळत नाही. यामुळे अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संपूर्ण प्रकाराकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी नगरसेवक बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात नगरसेविका दर्शना इंगोले, वैशाली सवई, नगरसेवक सलीम सागवान, जावेद अन्सारी, पल्लवी रामटेके, शब्बीर खान, ताहिराबी हबीब खान, नसीमा बानो शक्वीर, मोहसीन खान, उषा दिवटे आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, राहुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी सभापती अरूण राऊत, अनिल गायकवाड, संजय ठाकरे आदींनी उपोषण मंडपाला भेट दिली.