शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा सत्तेचा दावा, भाजपाही प्रयत्नात

By admin | Updated: March 21, 2017 00:04 IST

जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीची अधिकृत घोषणा झाली असताना काँग्रेसनेही आपलाच अध्यक्ष होणार असा दावा केला आहे.

जिल्हा परिषद : राजकीय गोंधळाची स्थिती, संख्याबळ जुळविण्याचे आव्हान यवतमाळ : जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीची अधिकृत घोषणा झाली असताना काँग्रेसनेही आपलाच अध्यक्ष होणार असा दावा केला आहे. त्यासाठी संख्याबळ जुळविता यावे म्हणून जोडतोड केली जात आहे. शिवसेनेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची तयारी केली. तोच पॅटर्न भाजपानेही वापरला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला जिल्हा परिषदेतील सत्तेचा लाभ घेऊ देऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. राष्ट्रवादी आपल्यासोबत असल्याचा दावा सेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत केला असताना काँग्रेसनेही राष्ट्रवादी आमच्यासोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितल्याने राष्ट्रवादी नेमकी कुणासोबत असा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसचा हा दावा पाहता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येते. एक गट सेनेसोबत तर दुसरा गट पक्षाच्या गटनेत्यासह भाजपाला अनुकूल असल्याचे चित्र आहे. भाजपानेही सत्तेसाठी अखेरपर्यंत प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस-भाजपा-अपक्ष-राष्ट्रवादीतील एक सदस्य यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्याची मोर्चेबांधणी चालविली आहे. त्याचवेळी शिवसेनेकडून आम्ही काँग्रेसचे काही सदस्य फोडल्याचा दावा केला जात असल्याने राजकीय गोंधळात आणखी भर पडली आहे. संख्याबळ जुळो अथवा नाही काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवार देणार, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच रस्सीखेच पाहता जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष मतदानानंतरच सत्ता कुणाची हे स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. सर्वच पक्ष सत्तेचा दावा करीत असल्याने व काही घोषणा करुनही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याने हा गोंधळ वाढला आहे. रात्रीतून आणखी वेगळे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. धक्कातंत्राची चिन्हे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेची अधिकृत घोषणा केली असली तरी अखेरच्या क्षणी धक्कातंत्र अवलंबिले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार अध्यक्ष काँग्रेसचा, उपाध्यक्ष भाजपाचा करण्याची तयारी आहे. राष्ट्रवादीतील एकाला सभापतीपद, अपक्षाला सभापतीपद तर अन्य दोन सभापती काँग्रेस व भाजपाला देण्याची व्युहरचना आहे. त्यासाठी संख्याबळ जुळविले गेले.जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता बसणार व काँग्रेसचाच अध्यक्ष होणार. - माणिकराव ठाकरे, उपसभापती विधान परिषद. भाजपासोबत बसण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा विरोध आहे. मात्र माणिकराव ठाकरे आग्रही आहेत. पण काँग्रेसचा निर्णय एकमताने होईल. - अ‍ॅड. शिवाजीराव मोघे माजी मंत्री सेना-राष्ट्रवादी युतीची घोषणा ऐकली. परंतु भाजपा अखेरपर्यंत आपले प्रयत्न कायम ठेवणार आहे. - मदन येरावारपालकमंत्री यवतमाळ