लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ विधानसभेसाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या नेतृत्वात गुरुवारी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा धामणगाव रोडवरील टिंबर भवनात मेळावा झाला. या मेळाव्यात माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार व ज्येष्ठ नेते सदाशिवराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, राष्ट्रवादीचे आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार कीर्ती गांधी, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकारी संध्याताई सव्वालाखे, किशोर दर्डा आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यानंतर माजी खासदार विजय दर्डा, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींच्या नेतृत्वात टिंबर भवन येथून मिरवणूक निघाली. मिरवणुकीत आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयात माजी खासदार विजय दर्डा, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
Maharashtra Election 2019; विजय दर्डा, माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत यवतमाळात काँग्रेस उमेदवाराचे नामांकन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 14:48 IST
यवतमाळ विधानसभेसाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या नेतृत्वात गुरुवारी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
Maharashtra Election 2019; विजय दर्डा, माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत यवतमाळात काँग्रेस उमेदवाराचे नामांकन दाखल
ठळक मुद्देसर्व नेत्यांनी बाहेर आल्यानंतर विजयाचे चिन्ह दर्शविले.