वरून गोंधळ आतून तमाशा : हवे तेव्हा पैसे काढा असे आकर्षक बिरूद मिरवणाऱ्या एटीएम केंद्रांनी सध्या नागरिकांची परीक्षा पाहणे सुरू केले आहे. यवतमाळ शहरातील अर्ध्या-अधिक एटीएममध्ये सोमवारी पैसेच नव्हते. भर उन्हात रांगा लावून एखादा ग्राहक जेव्हा तासाभरानंतर एसीच्या थंडगार हवेतील एटीएम मशिनपर्यंत पोहोचायचा, तेव्हा फक्त मशिनचे दर्शन घेऊनच परतायचा. पैशाऐवजी ‘पैसे नसल्याचा’ एक चिटोरा मिळायचा.
वरून गोंधळ आतून तमाशा :
By admin | Updated: May 16, 2017 01:24 IST