शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कार्यालयाची जप्ती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:39 IST

अपघात प्रकरणात नुकसानभरपाईचा आदेश दिल्यानंतरही विमा कंपनीने पैसे भरले नाही त्यामुळे बुधवारी येथील ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयावर जप्ती आणण्यात आली. मात्र कंपनीने दोन दिवसाची मुदत मागितल्याने ही जप्ती टळली.

ठळक मुद्देविमा रक्कम : दोन दिवसांचा अवधी मागितला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपघात प्रकरणात नुकसानभरपाईचा आदेश दिल्यानंतरही विमा कंपनीने पैसे भरले नाही त्यामुळे बुधवारी येथील ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयावर जप्ती आणण्यात आली. मात्र कंपनीने दोन दिवसाची मुदत मागितल्याने ही जप्ती टळली.कळंब येथील संजय गुल्हाने यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या प्रकरणी नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात आला. त्यानुसार दावा मंजूर होऊन विमा कंपनीला १५ लाख ५९ हजार ४०० रुपये देण्याचे आदेश २०१४ साली देण्यात आले. परंतु कंपनीने सदर पैसे भरलेच नाही. उलट कंपनी अपिलात गेली. येथेही गुल्हाने यांच्या बाजूने निकाल देत व्याजासह २९ लाख ४६ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले. परंतु कंपनी पैसे भरण्यास टाळाटाळ करीत होती. त्याविरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे इन्शूरन्स कंपनीच्या विरोधात जप्ती वॉरंट काढण्यात आला. बुधवारी हा वॉरंट बजावण्यासाठी बेलिफ बुद्धीराज काटपेलवार ओरियंटल इन्शूरन्स कंपनीच्या यवतमाळ येथील कार्यालयात पोहोचले. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा अवधी मागितला. दोन दिवसात पैसे न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे अ‍ॅड. भारत सोदी यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. एस.डी. देशमुख, अ‍ॅड. प्रियंका पुणेवार उपस्थित होते.