बाभूळगाव : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय सातव्या धम्म परिषदेच्या समारोप उत्साहात पार पडला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती गुणवंतराव देवपारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनमोहन भोयर, सतीश मानलवार, हेमंत ठाकरे, प्रकाश भूमकाळे, राजकुमार शेंडे उपस्थित होते. येथील भदंत आनंद समता परिसरात या धम्म परिषदेची सुरूवात धम्मानंद महास्थवीर यांच्या धम्मध्वजारोहणाने झाली. तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमात संविधान मनोहर यांच्या भीम बुद्घ गीतांचा कार्यक्रम पार पडला. धम्म परिषदेतील कार्यक्रमांचे संचालन दिलीप वाघमारे, धम्मपाल माने, रवींद्र डबले, सखाराम देवपारे, दीक्षा ढोले यांनी तर स्वागताध्यक्ष म्हणून गौतम लांडगे, महेंद्र खडसे, पराग पिसे यांनी तर विविध कार्यक्रमात आभार शैलेश उके, सुधाकर गडलिंग, महादेव वासे, दीक्षा मून, पद्माकर जाधव, प्रस्ताविक, कृष्णा रंगारी, संजय तिरपुडे, सुजाता मोडक यांनी केले. गौतम लांडगे, महेंद्र खडसे, पराग पिसे यांनी भोजन दान दिले. धम्म परिषदेला विजय डांगे, विनायक माहुरे, विजय भीतकर, उत्तम दिघाडे, सिद्धार्थ दातार, चुडामन मदारे, शरद हाडेकर, सुधाकर दातार, पंकज सोनटक्के, शालू सुटे, मिलिंद गोटे, दुर्वास गवई, मेघश्याम वासे, उत्तम मनवर, मनीष मनवर, युवराज दहाट, कमला रंगारी, रुचिका पिसे, इंदू मदारे, धम्मज्योती माहुरे, जया वाघमारे, राहूल विहीरे, वनमाला नाईक, रचना डबले, माया गडलिंग, रुपाली मनवर, कल्पना विहीरे, दिगांबर गावंडे, पूर्णानंद बनसोड, सुदाम डबले, श्रीकृष्ण परोपटे, दीपक बनसोड, सुधाकर खोब्रागडे, राजू रामटेके, अरविंद तायवाडे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
बाभूळगाव येथे धम्मपरिषदेची सांगता
By admin | Updated: January 17, 2017 01:23 IST