शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

‘एमओ’ला सक्तीची रजा

By admin | Updated: June 11, 2015 02:24 IST

येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी कांबळे कर्तव्य काळात रूग्णालयात उपस्थित नव्हत्या.

सर्पदंश : चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यूवणी : येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी कांबळे कर्तव्य काळात रूग्णालयात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे मार्डी येथील सर्पदंश झालेल्या अनामिका कोटरंगे या १० वर्षीय बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी डॉ.कांबळे यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड यांनी दिला.मार्डी येथील अनामिका सुनील कोटरंगे या १० वर्षीय बालिकेला मंगळवारी दुपारी सर्पदंश झाला. तिला प्रथम मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला वणी येथे ‘रेफर’ केले. त्यासाठी तेथील डॉक्टरांनी त्वरित वाहन उपलब्ध करून दिले. तिचे आई-वडील अनामिकाला घेऊन दुपारी १ वाजता येथील ग्रामीण रूग्णालयात पोहोचले. मात्र त्यावेळी रूग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे तिच्यावर तत्काळ उपचार होऊ शकले नाही. मंगळवारी दुपारी तेथे डॉ.माधुरी कांबळे यांची ड्युटी होती. त्या उपस्थित नव्हत्या. परिचारिकेने निरोप दिल्यानंतर अर्ध्या तासांनी त्या तेथे पोहोचल्या. तोपर्यंत अनामिकेने प्राण सोडला. ही बाब युवासेनेला कळताच शिवसेनेचे गणपत लेडांगे, युवा सेनेचे ललित लांजेवार, प्रमोद मिलमिले, भाजपाचे तारेंद्र बोर्डे रूग्णालयात पोहोचले. नंतर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारदेखील तेथे पोहोचले. बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉ. कांबळे यांच्यावर कारवाई करेपर्यंत मृतदेहाचे विच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका तिचे आई-वडील व आमदारांनी घेतली. त्यासाठी आमदारांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड यांना वणीत पाचारण केले. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड सायंकाळी ७ वाजता रूग्णालयात दाखल झाले. तोपर्यंत घटनेच्या वेळी वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात उपस्थित नसल्याने बालिकेचा मृत्यू झाला, असे लेखी बयाण अधीक्षक डॉ.चंद्रशेखर खांबे यांनी दिले. त्यानंतर आमदार, युवासेना व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी नऊ तास ग्रामीण रूग्णालयात ठिय्या मांडला. त्यांनी डॉ.माधुरी कांबळे यांना निलंबनाची मागणी केली.आमदार व डॉ.राठोड यांनी आरोग्य उपसंचालक व जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर डॉ.कांबळे यांची चौकशी करून त्यांना निलंबित केले जाईल. चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, असे लेखी आश्वासन रात्री १० वाजता देण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)वडिलांनी केली पोलिसांत तक्रार मृतक अनामिकेचे वडील सुनील कोटरंगे यांनी याप्रकरणी वणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीतून संबंधित डॉक्टरविरूद्ध सदोष मनुष्य वधाा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र वैद्यकीय सूत्रांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असी ठाणेदार अस्लम खान यांनी स्पष्ट केले आहे.