शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘एसटी’ कामगारांचा संप संमिश्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:19 IST

‘एसटी’ कामगारांनी वेतनवाढीविरोधात पुकारलेला अघोषित संप जिल्ह्यात संमिश्र राहिला. पांढरकवडा आगारातून अपवादानेच बस मार्गावर धावली. त्या खालोखाल वणी, पुसद आणि उमरखेडमध्ये बंदचा परिणाम जाणवला.

ठळक मुद्देपांढरकवडा कडकडीत : पुसदच्या आठ कामगारांसह जिल्ह्यात ४६ निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘एसटी’ कामगारांनी वेतनवाढीविरोधात पुकारलेला अघोषित संप जिल्ह्यात संमिश्र राहिला. पांढरकवडा आगारातून अपवादानेच बस मार्गावर धावली. त्या खालोखाल वणी, पुसद आणि उमरखेडमध्ये बंदचा परिणाम जाणवला. दरम्यान, महामंडळाचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत ४६ कामगारांना निलंबित करण्यात आले. यात पुसद आगाराच्या आठ कामगारांचा समावेश आहे.जिल्ह्यातील नऊही आगारातून दुपारी ४ वाजतापर्यंत ८८७ पैकी ४८० फेऱ्या रद्द झाल्या होत्या. यात प्रामुख्याने ग्रामीण भागात धावणाºया बसफेºयांचा समावेश आहे. पांढरकवडा येथून १०० पैकी केवळ तीन फेºया मार्गावर गेल्या. पुसद आगारातून १३९ पैकी केवळ ५९ फेºया सोडण्यात आल्या. वणी येथून ८३ पैकी केवळ १४ बसेस मार्गावर गेल्या. उमरखेड येथे १३२ पैकी ४८ फेºया विविध मार्गावर धावल्या. नेर येथे ७३ मधून ३४, दिग्रस येथे ४८ पैकी ४२ आणि राळेगाव येथे ५८ पैकी ५० फेऱ्या मार्गावर सोडण्यात आल्या.जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ आगारात संपाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १७५ पैकी १५१ फेºया या आगारातून सोडण्यात आल्या. दारव्हा आगार १०० टक्के सुरू राहिला. सर्व ७९ फेºया या आगारातून सोडण्यात आल्या होत्या. सकाळी बसफेºया सोडण्याची गती साधारण होती. दुपारनंतर धावणाºया फेºया कमी झाल्या. सकाळी २५ टक्के असलेले हे प्रमाण दुपारनंतर जवळपास ५५ टक्क्यावर पोहोचले होते. संपाची कुठलीही नोटीस देण्यात आलेली नव्हती. अचानक बसफेºया रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करत कामगारांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला आहे. हा संप यशस्वी झाल्याचा दावा काही कामगार संघटनांकडून केला जात आहे.कामगार सेनेचा सहभाग नाहीघाटंजी : कामगार सेनेचे सदस्य संपापासून दूर राहिले. यवतमाळ आगाराच्या काही फेºया घाटंजीवरून किनवट मार्गावर धावल्या. परंतु पांढरकवडा आगाराच्या गाड्या पूर्णपणे बंद होत्या. कामगार सेनेच्या सदस्यांमुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय कमी झाल्याचे सांगितले जाते. बसेस नसल्याने काही प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेतला.इंटक व कामगार संघटनेचे नेतृत्वपुसद : इंटकचे अध्यक्ष गफ्फार पठाण आणि कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद उत्तरवार यांच्या नेतृत्त्वात पुसद आगारातील कामगार संपात सहभागी झाले होते. कामगार सेना आणि महाराष्ट्र मोटर फेडरेशन कामगार संघटना संपात सहभागी नसल्याचे सांगण्यात आले. या आगारात संप ५० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला जाणार आहे. आगार व्यवस्थापक प्रताप राठोड म्हणाले, दररोज दुपारी १ वाजतापर्यंत ३६ गाड्यांचे शेड्यूल असते. मात्र कर्मचाºयांच्या संपामुळे २० गाड्या निघाल्या, तर १६ रद्द झाल्या असे ते म्हणाले.

टॅग्स :ST Strikeएसटी संप