शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातील जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:11 IST

येथील जांब रोडस्थित जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. बुधवारी यासंबंधी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मंत्रालयातील बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जांब रोडस्थित जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. बुधवारी यासंबंधी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.या उद्यानासाठी ७ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून करण्यात आलेल्या कामांचाही वनमंत्र्यांनी आढावा घेतला. यात २१ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ५ कोटी ७१ लाख रुपयांची १३ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.या कामाला आणखी वेग देण्यात यावा. यासंबंधीच्या कामाचे वेळापत्रक निश्चित करावे. त्याप्रमाणे उद्यानाची सर्व कामे वेळेत म्हणजे २६ जानेवारी २०१९ पूर्वी पूर्ण करावित. याबरोबरच आॅक्सिजन पार्कचे कामही गतीने पूर्ण करावे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. या कामात लोकांना सहभागी करून घेऊन त्यांच्या चांगल्या सूचना अंमलात आणाव्यात, असे त्यांनी सांगितले.या दोन्ही ठिकाणी शाळांच्या सहली आयोजित केल्या जाव्यात, शालेय विद्यार्थ्यांनाही जैवविविधता उद्यान आणि आॅक्सिजन पार्कमधील झाडांचे महत्त्व समजावून सांगितले जावे. त्यातून महसूल मिळवण्याचा प्रयत्न केला जावा. हत्तीखान्यातील जागेसंबंधी वन विभागाने अभ्यास करून निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, वन सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार