शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

न्यायालयीन चौकशी समितीकडे डझनावर तक्रारी

By admin | Updated: February 7, 2015 01:36 IST

आदिवासी विकास विभागाच्या पांढरकवडा प्रकल्पात तब्बल दहा वर्षांपूर्वीच्या गैरकारभाराची न्यायालयीन समितीमार्फत चौकशी सुरू आहे.

यवतमाळ : आदिवासी विकास विभागाच्या पांढरकवडा प्रकल्पात तब्बल दहा वर्षांपूर्वीच्या गैरकारभाराची न्यायालयीन समितीमार्फत चौकशी सुरू आहे. आतापर्यंत डझनावर तक्रारी समितीपुढे आल्या असून ही समिती आणखी दोन दिवस मुक्कामी आहे. सन २००४-०५ ते २००९-१० या पाच वर्षाच्या काळात आदिवासी विकास विभागात अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आहे. आदिवासींच्या नावावर योजना राबविल्या गेल्या. मात्र प्रत्यक्षात त्याचा लाभ त्यांना मिळाला नाही. कागदोपत्री लाभार्थी दाखविणे, गैरआदिवासींना योजनांचा लाभ देणे, बोगस व निकृष्ट साहित्य पुरवठा, बोगस लाभार्थी असे प्रकार घडले आहे. या प्रकारांची न्यायालयीन समितीमार्फत चौकशी सुरू आहे. या समितीचे सुनील भोसले, डी.के. गायकवाड आणि काळे हे तीन सदस्य दोन दिवसांपासून पांढरकवडा येथे दाखल आहे. त्यांच्या पुढे डझनावर तक्रारी आणि तक्रारदार आले आहेत. त्यांनी लाभासंंबंधी केलेल्या तक्रारींची अभिलेख्यांवरून खातरजमाही करण्यात आली. ही समिती दोन दिवस प्रकल्प कार्यालयात तळ ठोकून होती. गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस ही समिती प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन योजनांच्या अंमलबजावणीची खातरजमा करणार आहे. तब्बल दहा वर्षांपूर्वीच्या योजनेची चौकशी असल्याने रेकॉर्ड दाखविताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. एक तर पांढरकवड्याचे प्रकल्प कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. दहा वर्षांपूर्वी रेकॉर्ड सांभाळणारे संबंधित दोन-तीन लिपिक सेवानिवृत्त झाले आहे. तर इतर संबंधितांच्या बदल्या झाल्या आहेत. त्या सर्वांना न्यायालीन समितीला रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे. पाचच वर्षाच्या कार्यकाळातील ही चौकशी असली तरी त्यानंतरच्या काळातही आदिवासी प्रकल्पात अनेक घोटाळे झाले असल्याचे सांगण्यात येते. त्यातीलच एका प्रकरणात प्रकल्प अधिकाऱ्याला एसीबीने आरोपी बनविले होते. इतरांचे काय असा प्रश्न आहे. (जिल्हा प्रतिनिधी)